अखेर त्याला अमरावतीच्या वडारपुऱ्यातून केली अटक

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : गेल्या दीड वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेणाऱ्या आरोपीला मारेगाव व अमरावती येथील फैजपूरा पोलीस स्टेशनच्या पथकाने व पोलिस अधिकारी यांच्या साह्याने अमरावतीमधील वडारपुरा येथून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आले.

मारेगाव पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार दीड वर्षापूर्वी मारेगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा पोलिस तपास करीत असताना आरोपी संतोष दत्ता चौगुले (24)  रा. मारेगाव हा कोरोनाकाळापासून पोलीसांना चकमा देत होता त्यामुळे पोलिसांच्या हाती अपयश येत होते.

अचानक मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पथक नेमून यामध्ये ए एस आय ताजणे, प्रमोद जिडेवार, अजय वाभीडकर, रजनीकांत पाटील, यांचे पथक तयार करून अमरावती येथे पाठवण्यात आले. मोबाईलचे लोकेशन मिळत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या कसरती चा सामना पोलिसांना करावा लागत असताना अखेर वडारपुऱ्यात दीड वर्षापासून भाड्याचे रूम करुन राहत असणाऱ्या ठिकाणावरून अमरावती पोलीस व मारेगाव पोलीस यांचे संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आले. आरोपी विरोधात अपराध क्रमांक 322,20, विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आला.

सदर आरोपी गजाआड असून घटनेचा अधिक तपास  पोलीस करीत आहे.
अखेर त्याला अमरावतीच्या वडारपुऱ्यातून केली अटक अखेर त्याला अमरावतीच्या वडारपुऱ्यातून केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on April 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.