वसंत कुलसंगे उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली - प्रशासनाचे दुर्लक्ष


सह्याद्री चौफेर | न्यूज 

गडचिरोली : चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी साठी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर या मागणी चे तीन दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत वसंत कुलससंगे यांचे उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

या उघोषणामुळे कुलसंगे यांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज दुपारी त्यांची तपासणी केली.

उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनातर्फे त्यांच्या मागणीची अजून पर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. मात्र, वीर बाबुराव स्मारकाची दुरुस्ती होई पर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार कुलसंगे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आदीवासी समाजाच्या विवीध संघटना व कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. काल या कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी ग गडचिरोली यांना निवेदन सुध्दा सादर केले. गोंडवाना गणतंत्र पार्टी, अखील भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, बिरसा क्रांती दल, गोंडवाना गोटूल समिती आदिवासील महीला परिषद इ. संघटनांचा त्यात समावेश होता. 

वीर बाबुराव स्मारकाचे कंत्राटदाराने केलेल्या नुकसानीचा तीव्र निषेध करून या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच स्मारकाचे नुकसान करणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही भागणी केली आहे. दरख्यात अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यास रोहिदास राऊत, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे, सुरज मडावी, लोमेश गेडाम, माजी नगरसेविका वर्षात ताई शेडमाके, माझी पोलीस निरीक्षक शिवराम कुमरे, मंजुळाताई पुढे, मनीराम दुग्गा व अन्य कार्यकर्ता. यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.


वसंत कुलसंगे उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली - प्रशासनाचे दुर्लक्ष वसंत कुलसंगे उपोषणाचा चौथा दिवस; प्रकृती खालावली - प्रशासनाचे दुर्लक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on April 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.