नरसाळा जि.प.शाळेत मध्यान्ह भोजन योजना सुरु


विवेक तोडासे | सह्याद्री न्यूज 

मारेगाव : राज्यात 'मिड डे मिल' (मध्यान्ह भोजन) योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली. शाळेत कोणतेही मूल कुपोषित राहू नये, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ही योजना सुरू झाली होती. मात्र कोरोना काळात मध्यान्ह भोजन बंद होते. परंतु आता मात्र, कोरोना संसर्ग ओसरल्याने शाळा सुरु झाल्या शिवाय मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना शाळेत मिळू लागले.
महाराष्ट्र शासनाकडून शालेय पोषण योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत असून सदर योजना ही दिनांक 15 मार्च 2022 पासून शासन आदेशान्वये सुरु करण्यात आली. परंतु शाळेला धान्य पुरवठा नसल्याने ही योजना बंद होती. मात्र, 31 मार्च 2022 ला धान्य पुरवठा शाळेला उपलब्ध झाल्यामुळे दि.1 एप्रिल 2022 पासून मध्यांन्ह भोजनाला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.

नरसाळा येथील नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे भोजन आहारावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष शालेय भोजनाची तपासणी करून त्याचा स्वाद तपासून पाहत आहेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या सुद्धा भोजन आहारात काही कमी राहू नयेत म्हणून काळजी घेताना दिसत असून, येथील सर्व शिक्षकवृंद विध्यार्थ्यांना भोजन आहार उत्तम प्रकारचे मिळण्यासाठी प्रयत्नात असतात.
नरसाळा जि.प.शाळेत मध्यान्ह भोजन योजना सुरु नरसाळा जि.प.शाळेत मध्यान्ह भोजन योजना सुरु Reviewed by सह्याद्री चौफेर on April 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.