कुलसंगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस : विविध संघटननांनी भेट देऊन दिले समर्थन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

गडचिरोली : राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके स्मारकाचे झालेले नुकसान त्वरीत दुरुस्त करुन देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले गडचिरोली येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांना काल दिनांक ०५ एप्रील २०२२ रोजी प्रकृती खालावल्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुलसंगे यांच्यावर उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे .
            
दरम्यान गडचिरोली येथिल प्रसिद्ध सामाजिक कायकर्ते डॉ.शिवनाथ  कुंभारे सर, गुरुदेव सेवा मंडळचे पंडीत पुडके सुखदेव वेठे, विविध सामजिक संघटनांच्या महिला कार्यकर्ता रुग्णालयात जाऊन वसंत कुलसंगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तसेच या संपू्र्ण उपोषणाला व कुलसंगे यांनी केलेल्या मागणीला संपूर्ण समर्थन जाहिर केले. कुलसंगे यांनी शासनापुढे मांडलेल्या मागणीचा पाठपूरावा करण्यासाठी गडचिरोली शहरातील तथा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकिय संघटना ह्या एकवटलेल्या असून या येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी सर्व कार्यकर्तांनी व्यक्त केला.
        
विशेष म्हणजे चामोर्शी रोडवरील वीर बाबुराव शेडमाके स्मारकाची नासधूस राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी केली होती आणि त्यामुळे हे स्मारक मोडकळीस आले असुन कोणत्याही क्षणी कोसळू शकते व असे जर झाले तर त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्य हानी व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे या स्मारकाची त्वरीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. म्हणुन कुलसंंगे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. चार दिवस उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांच्या सल्यानुसार त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके यांच्या गडचिरोली -चामोर्शी महामार्गावरील स्मारकांचे राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे प्रचंड नुकसान कलेल्या ठिकाणास गडचिरोलीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथ कुंभारे साहेब, माजी आमदार आनंदराव गेडाम साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे पंजीत पुडके साहेब, वेठे साहेब , जेष्ठ पत्रकार रोहीदास राऊत सर इत्यादी सामाजिक तथा राजकिय कार्यकर्त्यांनी घटनास्थळालाा प्रत्यक्ष भेट दिली. तसेच शहिद वीर बाबुराव शेडमाके स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहनी करुन त्यावर सविस्तर चर्चा केली.        
(शासकिय रुग्णालयात उपोषणादरम्यान उपचार घेतांना वसंतराव कुलसंगे साहेब)

त्याचप्रमाणे स्मारकाच्या नुकसान भरपाईसाठी मा.वसंतरावजी कुलसंगे यानी दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ पासून केलेल्या आमरण उपोषणास संपूर्ण समर्थन दर्शवून पूर्ण पाठींबा दर्शविला आहे. उपोषणाच्या ४ थ्या दिवसी डॉक्टरांच्या सल्याने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याबाबत शारीरीक प्रकृतीची चौकशी केली. 
        
त्याचप्रमाणे शहिद स्मारकाच्या नुकसानग्स्त भागाची पूर्ववत बांधनी करण्यासाठी शासन तथा प्रशासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचेही सांगीतले.

"जो पर्यंत शहिद स्मारकाच्या नुकसानग्रस्त भागाची पूर्ववत पायाभरणी करणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार राष्ट्रीय वीर बाबुराव शेडमाके आदिवासी विकास प्रबोधन समीतीचे संस्थापक अध्यक्ष मान. वसंतराव कुलसंगे यानी निर्धार केला आहे."
कुलसंगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस : विविध संघटननांनी भेट देऊन दिले समर्थन कुलसंगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस : विविध संघटननांनी भेट देऊन दिले समर्थन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.