गुढीपाडवा शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडीचे शुभारंभ


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठी बाजार पेठ असलेले मुकूटबन ग्रामपंचायत कडे मागील वेळेस बॅटरीवर चालणाऱ्या दोन घंटा गाडी ग्रामपंचायतनी खरेदी केली परंतु काही वर्षे चालल्यानंतर नेहमीच बंद पडू लागल्याने यावर्षी गुढीपाडवा (मांडवस) व नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर नवीन कचरा गाडी खरेदी करण्यात आली असून या नवीन गाडीचे सरपंच मिना आरमुरवार हस्ते पूजन करण्यात आले. नवीनच आलेल्या डिझेलवर चालणाऱ्या कचरा गाडीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी चर्चा उपस्थीत नागरिकांत होती.

यावेळी भालचंद्र बरशेटटीवार, गणेश चींतावार, संजय आकीनवार, नागेश अक्केवार, संजय परचाके, प्रशांत बघेले, संजय पारशिवे, राकेश नीमलवार, नयन पुलबोईनवार, बंडू उदकवार, गोलू मंदूलवार, व ईतर ग्रामस्थ उपस्थीत होते.

मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून मराठीची श्रीमंती जगाला कळावी- मुख्यमंत्री


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, देशातीलच नव्हे तर परदेशातील माणसंही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे, असे जगातील सर्वोत्तम भवन उभे रहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार दिवाकर रावते, सुनिल शिंदे, आशिष शेलार, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा भवनचे भूमिपूजन आणि फलकाचे अनावरण करण्यात आले.

उपस्थित जनसमुदायाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षांच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, हे भवन केवळ मराठी भाषा भवन नसून ते आपल्या मातृभाषेचे मंदीर आहे. आज या शुभमुहुर्तावर आपल्या मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करत आहोत. याचा आनंद, समाधान आहे. जबाबदाऱ्या पार पाडतांना काही जबाबदाऱ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद देणाऱ्या असतात. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद देणारी घटना आहे.

मराठी भाषेच्या वाटचालीचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठी माणुस म्हटलं की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारकही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले, मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचा काम ज्यांनी केले. त्यांच्यासाठी मराठी भाषा भवन तयार करण्याची बाब अभिमानाची आहे.

या राज्यात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये.

पारतंत्र्य काय असते हे आपल्याला बघायला मिळाले नाही हे आपले नशिब आहे पण इंग्रजांच्या राजवटीत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा अग्रलेख लिहून इंग्रजाना लोकमान्य टिळकांनी मराठीतूनच जाब विचारला होता. मराठी भाषेचे महत्व यावरुन अधोरेखित होते. रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रह मुख्यंमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण आहेत त्याला पर्यायी शब्द सुचविण्याचे काम मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हाती घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले. एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलितेही सोप्या भाषेत केले.

इतर भाषेचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, सहन करणार नाही. छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचे तेज तळपले पाहिजे महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या मातृभाषेचे हे मंदिर आहे. याचे काम करतांना कुठलीही कमतरता नसावी असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.

मशरूम उत्पादन यावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन


 सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
  
मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वनस्पतीशास्त्र विभाग व एस. पि. एम. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी जि. यवतमाळ वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, (ता.२६) मार्च रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळा "Mushroom Cultivation" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे करीता प्रा. डॉ. डि. व्ही. हांडे, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती व प्रा. डॉ. उज्वला सुपे, जैविकतंत्रज्ञान विभाग, सॅंट थॉमस महाविद्यालय, भिलाई, छतीसगढ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. 
डॉ. हांडे यांनी विविध प्रजाती व विषारी व बिनविषारी मशरूम कशे ओळखावे या संदर्भात माहिती दिली. तर डॉ. सुपे यांनी मशरूम ची लागवड कशी करावी व त्याचे उत्पादन कसे घ्यावे याचे प्रात्यक्षिक दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेहजाद, प्राचार्य, एस. पि. एम. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी जि. यवतमाळ यांनी केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर डॉ. अविनाश घरडे, प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव जी. यवतमाळ, यांनी परवानगी देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. धारकर यांनी मार्गदर्शक डॉ. हांडे यांचा परिचय दिला व डॉ. चव्हाण यांनी डॉ. उज्वला सुपे यांचा परिचय दिला.

या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उतस्फूर्त प्रतिसाद मिळाला तर दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकानी सहभाग नोदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अड्सरे यांनी परिश्रम घेतले.

विश्वकल्याण बहुउद्देश्यीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी तर्फ मोफत भारतीय सैन्य व पोलीस भर्ती प्रशिक्षण चे आयोजन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : जिल्ह्यातील मूल व मुलींन मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य व पोलीस भर्ती व्हावे यासाठी मोफत भर्ती पूर्व प्रशिक्षण शिबिर चे आयोजन करण्यात आलेले आहेत,

यवतमाळ जिल्ह्यातील ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राइम कैपिटल म्हणून ओळख आहे,जिल्ह्यात बेरोजगारी मुळे युवक मोठया प्रमाणात वाईट व्यसनाच्या विळख्यात व गुन्हेगारी क्षेत्रात वळत आहे,जिल्ह्यातील ही ओळख पुसून काढण्यासाठी विश्वकल्याण बहुउद्देशीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी चे संस्थापक व संचालक श्री अमित मिश्रा व त्यांचे सहकारी माजी पोलिस उपनिरीक्षक श्री वसंत मडावी व भारतीय सैन्यातील कमांडो श्री शेखर वर्मा, जुडो कराटे मास्टर श्री व्यंकटेश कुमार, शारीरिक क्रिडापट्टू इर्शाद भाई, राष्ट्रीय बॉक्सर अनुपम मिश्रा यांनी जिल्ह्यातील मुलां व मुलींसाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आलेले आहे.
(जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198)

त्यांच्या या शिबिराला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे,त्यांच्या या शिबिरात 150 मुलं व मुली आहेत.
या शिबिरात प्रत्येक मुलांना व मुलींना ट्रॅक सूट व अन्य सामग्री पण मोफत देण्यात येणार आहेत. भर्ती प्रशिक्षण सोबत सर्वांसाठी बॉक्सिंग क्लास,पॉवर योगा,जुडो-कराटे,वजन वाढवणे व घटवने,आत्मरक्षा चे धडे,लाठी काठी व दांडपट्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

पुढच्या टप्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलां व मुलींनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कमांडो फिजिकल अकादमी चे संस्थापक व संचालक श्री अमित मिश्रा यांनी केले आहेत.

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस कमिटीने केला गॅस व दुचाकीला हार घालून भाजप सरकार चा निषेध!

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ. आज बघता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची वाढ होत आहे. आठवड्याभरात इंधनात भरमसाठ दरवाढ! तसेच घरगुती गॅसचे दर गगनाला भिडत असल्याने केंद्रातील मोदी सरकार चा काँग्रेस च्या वतीने मारेगाव येथे जाहीर निषेध करण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष वजाहत मिर्जा यांचे सूचनेनुसार माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात काँग्रेस चे नेते नरेंद्र पाटील ठाकरे व अरुणाताई खंडाळकर यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे दुचाकी व गॅस सिलेंडर ला हार घालून निदर्शने करीत भाजप सरकार चा जाहीर निषेध करण्यात आला.
(जाहिरातसाठी संपर्क -7218187198)

केंद्रातील भाजप सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेलाचे भाव वाढवून देशातील नागरिकांचे अक्षरशः बेहाल करून जीवन जगणे कठीण केले आहे. मोदी सरकारला जनतेचे काही देणे घेणे नसून खोटे बोलून सत्ता हस्तगत करणे, केवळ हाच उद्देश भाजप सरकारचा असल्याचा आरोपही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेस कमेटी ने केला आहे. सलग पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस चे भाव गगनाला भिडत असल्यामुळे माता भगिनींना संसार चालविणेही आता कठीण झाले. केंद्र सरकारने त्वरित या जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करावे असे न केल्यास काँग्रेस कमेटी च्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही मारेगाव तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामार्फत मोदी सरकारला देण्यात आला आहे.

यावेळी कृ.उ.बा.स.मारेगाव चे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे,जि. प.सदस्या अरुणाताई खंडाळकर, जेष्ठ नेते शकील अहेमद शकील कुरेशी, कृ. उ.बा.स.चे उपसभापती वसंत आसुटकर, जिल्हा सरचिटणीस रमण डोये, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, शहर अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शंकरराव मडावी, वसंत जिनिंग चे संचालक उदय रायपुरे, सरपंच तुळशीराम कुमरे, उपसरपंच प्रफुल विखनकर आदीसह काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.