मशरूम उत्पादन यावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन


 सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
  
मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वनस्पतीशास्त्र विभाग व एस. पि. एम. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी जि. यवतमाळ वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, (ता.२६) मार्च रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळा "Mushroom Cultivation" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे करीता प्रा. डॉ. डि. व्ही. हांडे, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती व प्रा. डॉ. उज्वला सुपे, जैविकतंत्रज्ञान विभाग, सॅंट थॉमस महाविद्यालय, भिलाई, छतीसगढ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. 
डॉ. हांडे यांनी विविध प्रजाती व विषारी व बिनविषारी मशरूम कशे ओळखावे या संदर्भात माहिती दिली. तर डॉ. सुपे यांनी मशरूम ची लागवड कशी करावी व त्याचे उत्पादन कसे घ्यावे याचे प्रात्यक्षिक दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेहजाद, प्राचार्य, एस. पि. एम. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी जि. यवतमाळ यांनी केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर डॉ. अविनाश घरडे, प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव जी. यवतमाळ, यांनी परवानगी देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. धारकर यांनी मार्गदर्शक डॉ. हांडे यांचा परिचय दिला व डॉ. चव्हाण यांनी डॉ. उज्वला सुपे यांचा परिचय दिला.

या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उतस्फूर्त प्रतिसाद मिळाला तर दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकानी सहभाग नोदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अड्सरे यांनी परिश्रम घेतले.
मशरूम उत्पादन यावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन मशरूम उत्पादन यावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.