सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या निमित्ताने सकाळी ५.३० वाजता ध्यानपाठ, सकाळी ६.३० वाजता ग्रामगिता वाचन, ९.०० भजनाचा कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता सामुदायिक प्रार्थना, ११ वाजता पाहुण्यांचे भावपूर्ण मनोगत, तसेच कार्यक्रमच्या शेवटी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना भोजन प्रसाद देण्यात आला.
या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्व. राधाबाई सुर्यभान कुमरे यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन चिरंजीव श्री. बादल सुर्यभान कुमरे व अमोल सुर्यभान कुमरे यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
