विश्वकल्याण बहुउद्देश्यीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी तर्फ मोफत भारतीय सैन्य व पोलीस भर्ती प्रशिक्षण चे आयोजन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : जिल्ह्यातील मूल व मुलींन मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य व पोलीस भर्ती व्हावे यासाठी मोफत भर्ती पूर्व प्रशिक्षण शिबिर चे आयोजन करण्यात आलेले आहेत,

यवतमाळ जिल्ह्यातील ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राइम कैपिटल म्हणून ओळख आहे,जिल्ह्यात बेरोजगारी मुळे युवक मोठया प्रमाणात वाईट व्यसनाच्या विळख्यात व गुन्हेगारी क्षेत्रात वळत आहे,जिल्ह्यातील ही ओळख पुसून काढण्यासाठी विश्वकल्याण बहुउद्देशीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी चे संस्थापक व संचालक श्री अमित मिश्रा व त्यांचे सहकारी माजी पोलिस उपनिरीक्षक श्री वसंत मडावी व भारतीय सैन्यातील कमांडो श्री शेखर वर्मा, जुडो कराटे मास्टर श्री व्यंकटेश कुमार, शारीरिक क्रिडापट्टू इर्शाद भाई, राष्ट्रीय बॉक्सर अनुपम मिश्रा यांनी जिल्ह्यातील मुलां व मुलींसाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आलेले आहे.
(जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198)

त्यांच्या या शिबिराला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे,त्यांच्या या शिबिरात 150 मुलं व मुली आहेत.
या शिबिरात प्रत्येक मुलांना व मुलींना ट्रॅक सूट व अन्य सामग्री पण मोफत देण्यात येणार आहेत. भर्ती प्रशिक्षण सोबत सर्वांसाठी बॉक्सिंग क्लास,पॉवर योगा,जुडो-कराटे,वजन वाढवणे व घटवने,आत्मरक्षा चे धडे,लाठी काठी व दांडपट्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

पुढच्या टप्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलां व मुलींनी सहभाग घ्यावा,असे आवाहन कमांडो फिजिकल अकादमी चे संस्थापक व संचालक श्री अमित मिश्रा यांनी केले आहेत.
विश्वकल्याण बहुउद्देश्यीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी तर्फ मोफत भारतीय सैन्य व पोलीस भर्ती प्रशिक्षण चे आयोजन विश्वकल्याण बहुउद्देश्यीय संस्था व कमांडो फिजिकल अकादमी तर्फ मोफत भारतीय सैन्य व पोलीस भर्ती  प्रशिक्षण चे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.