सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वारकरी संप्रदायाचे दादाजी निकुडे यांचे हृदयविकाराने निधन
नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची सुरु झाली गर्दी; लता वाळके,साधना वाढई,ज्योति गेडाम नाव चर्चेत
सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : नागरी स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचे नि काल हाती आल्यानंतर अपेक्षे प्रमाने का होईना सा ऱ्याच पक्ष्याने आपापल्या परिने प्रयन्त करुण उमेदवार निवडून आणण्याचा प्रयन्त केला. मात्र, मतदारानी इतराना आपली जागा दाखवत विकासाच्या दृष्टीने कौल दिला सावली न प निवडणुकीत काँग्रेसने १४ उमेदवार निवडुन आणित पुन्हा दुस ऱ्यादा आपला तिरंगा फडकविला तर भाजपाने ३ उमेदवार निवडून आणून आपले खाते उघडले परंतु बसपा सह इतराची मोठी गोची झाली त्यामुळे सदरचा निकाल अनेकांना आत्मचिंतन करणारा ठरला निकाला नतर नगराध्यक्ष पदाच्या सोडतीकडे. सर्वाचे लक्ष लागले होते अनु जमाती कींवा खुला प्रवर्ग असा अनेकांचा अंदाज असताना सावली नगर पंच्यायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला निघाल्याने नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापु लागले आहे आपल्याच मताची महिला नगराध्यक्ष व्हावी अशी अनेकाची इच्या असून या बाबत निर्वाचित उमेदवारात आंतरिक कुजबुज सुरु आहे त्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी लता वाळके,साधना वाढ़ई, ज्योति गेडाम आदि नावाची जोरदार चर्च्या सुरु आहे.
सावली नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद.हे सर्वसाधारण महिला असे निघाल्याने.निर्विवाद बहुमत असलेल्या कांग्रेस पक्षाकडे लता लाकडे, साधना वाढ ई, ज्योती गेडाम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे, असे असले.तरी यामधे बहुतेक चेहरे हे.पहिल्यांदा निवडुन.आले असून कांग्रेस पक्षाकडे सहा महिलाचा समावेश आहे ,परंतु लता लाकडे या प्रभाग क्रमांक १६ (अनुसूचित जाती महिला) मधून सर्वात जास्त २८३ अशी मते घेत विजय झाल्या यापूर्वी त्या तत्कालीन ग्रामपंचायत असताना सन १९९५ -२००० या कालावधीत त्या सरपंच (भारिप ) म्हणून योग्य कामगिरी बजाविली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात झाली. पेशाने अध्यापिका असताना सामाजिक जाण ठेऊन अनेक कार्यात त्या हिरहिरिने भाग घेत महिला संघटन एक वक्त त्यामुळेच जयभीम वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष म्हणून त्या आपले कार्य पार पाडित आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी लता लाकडे या नावाला अधिक पसंती दिली जात आहे तर दुसरीकडे विचार केल्यास माळी समाजाच्या साधना वाढई या सुध्दा ग्रामपंचायत असताना दोनदा ग्रामपंचायत सदस्य तर ,नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यावर पहिल्या टर्म मध्येही त्या माळी साजाचे नेतृत्व करत निवडुन आल्या. ग्रा.प. ते नगरपंच्यायत पर्यन्त चा मोठा काळ त्यानी प्रशासन नात घालविला त्यामुळे सामाजिक राजकीय आणि स्थानिक प्रशासनाचा दाडगा अनुभव त्यामुळे सुधा नगराध्यक्ष पदासाठी साधना वाढई याचे नाव चर्चिले जात आहे तर सर्वसाधारण गटातून ज्योती गेडाम या निवडून आल्या त्या ढिवर (एन.टी) समाजातील असल्याने त्या सुधा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इछुकांची भाऊ गर्दी सुरु असल्याचे दिसुन येत आहे निवडून आलेल्या महिला पैकी महिला आरक्षण असल्याने अनेकांनी माला संधि मिळावी यासाठी गुड़ग्याला बारशिग बांधुन तयार असले तरी राज्याचे. काबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सावली नगराचा कायापालट कसा करता येईल यावर जोर देत सावली वासियांनी कांग्रेसला निर्विवाद दुसऱ्यानंदा संधि बाहाल केली आहे त्यामुळेच नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणत्या महिलेच्या गळ्यात पडेल हे पक्षश्रेष्ठीच ठरवेल. मात्र, लता लाकडे या नावाला अनेकांची अधिकच पसंती दिली जात असल्याचे चर्चेत समोर येत आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिं 25 जाने 2022 ला मतदार दिनानिमित्त भाषण व ई -घोषवाक्य कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये कु. आचल किन्हेकार, तेजस्वी वांढरे व शुभांगी मुंघाटे आदींनी मी मताधिकार बजावतो या विषयावर भाषण दिले तसेच इतर रासेयो विद्यार्थ्यांकडून ई - घोषवाक्य लिहून घेऊन समाजामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी हाच एक उद्देश प्रत्येकानी मनाशी बाळगला. प्रसंगी रासेयो विद्यार्थिनी कु. आचल प्रवीण किन्हेकार हिने SPM महाविद्यालय, चिखली द्वारे मतदान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले या विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी अभिनंदन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेकारिता रासेयो कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब देशमुख व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भगत सर आणि शेंडे मॅडम यांनी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा गठीत, प.स. उपसभापती यांच्या हस्ते झाले शाखा फलकाचे उद्घाटन
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शाखा फलकाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी उदघाटक म्हणून प.स. उपसभापती चंद्रज्योती शेंडे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, नांदेपेराचे सरपंच विलास चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण खामनकर, जेष्ठ सदस्य सुखदेव येरेकार, भास्कर खोले, पांडुरंग खोले, पंढरी बोधे यांची उपस्थिती लाभली. तसेच या शाखा उद्घाटन प्रसंगी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी चे संस्थापक सदस्य विनोद ढेरे, किशन कोरडे, श्याम गिरडकर, भालर शाखेचे सचिव पंकज वादेकर व समाज बांधव उपस्थित होते.
नांदेपेरा शाखेचे शाखा अध्यक्ष म्हणून रामा कोल्हे, उपाध्यक्ष प्रविण खोले तर सचिव पदी विकास खोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन देविदास खोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव, समाजातील महिला व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
खनिज निरीक्षक बंडू वरखेडेंसह खनिकर्म पथकाने पकडले रात्रीला अवैध गाैण खनिज वाहने !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २९ जानेवारीला रात्री ११ नंतर लक्कडकाेट मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे व प्राणाची पर्वा न करता अवैध गाैण खनिजाची वाहने खनिज निरीक्षक बंडु वरखेडे व त्यांचे पथकाने पकडल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी या पूर्विच आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अश्या अवैध गाैण खनिज वाहनांवर माेठ्या प्रमाणात कारवायां करीत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येते. दरम्यान या दाेन्ही वाहनांचे चालक कुठलेही गाैण परवाने नसतांना सर्रासपणे गिट्टीची वाहतुक करीत हाेते. वाहन चालक प्रमाेद जैस्वाल (मध्यप्रदेश) व मोहम्मद हासीन खाँन (उत्तर प्रदेश) यांनी जप्तीनामावर आपली स्वाक्षरी केली असुन ही जप्तीतील गिट्टीची दाेन्ही वाहने राजूरा तालुक्यातील लक्कडकाेटचे पाेलिस पाटील देविदास फकरु कातकर यांचे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आलेली आहे यातील वाहनाचे क्रमांक एम.एच २३ ऐयु २४९३ व एम.एच.२३ऐयु २६१० अशी आहे. या धडक कारवाया मुळे अवैधरित्या गाैण खनिजांची वाहतुक करणा-या तस्करांत अक्षरशः खळबळ उडाली आहे. दाेन दिवसांपुर्विच जिवतीचे प्रभारी तहसीलदार प्रविण चिडे व काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध रेती तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.
वेळ प्रसंगी त्यांनी मुजाेर व अरेरावी करणा-या रेती तस्करांवर पाेलिस कारवाया देखिल केल्या आहे तर खनिकर्म विभागाने काल रात्री केलेल्या कारवायांचे जनतेनी स्वागत केले आहे. अवैध गाैण खनिजांच्या बाबतीत काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांच्या कारवायां सातत्याने सुरु आहे.हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.
Subscribe to:
Posts (Atom)