सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वारकरी संप्रदायाचे दादाजी निकुडे यांचे आज पहाटे व्हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज 31 जानेवारीला दुपारी 2 वाजता शिरपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. वारकरी संप्रदायाशी अनेक वर्षांपासून जुळून असलेले, व वारकरी प्रचारक म्हणून ते शिरपूर या गावात सर्व परिचित होते. पंढरपूरची न चुकता वारी करुन त्यांनी आपली निष्ठा जोपासली होती. साधं राहणीमान असलेल्या दादाजी निकुडे यांनी वारकरी म्हणून आपलं जिवन व्यतित केलं. ते आज सकाळी कापसाचे गाठे आणण्याकरिता गेले असता त्यांना व्हृदय विकाराचा झटका आला, व काही क्षणातच त्यांचा मृत्यु झाला. वारकरी संप्रदायाच्या प्रचाराची धुरा सांभाळणारा एक सच्चा वारकरी सर्वांना सोडून गेल्याने वारकरी व गावकरी शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.