सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : अवैध गाैण खनिजांवर कारवाया करण्यांसाठी महसुल विभागाच्या अधिका-यांनी व कर्मचा-यांनी कंबर कसली असुन काल रविवार दि.३० जानेवारीला मध्यरात्रीला काेरपना भागातील पैनगंगा नदीच्या पात्रातुन अवैध रेती नेणां-या दाेन ट्रॅक्टरला पकडल्याचे वृत्त आहे.या धडक कारवाया काेरपना महसुल विभागाचे पटवारी विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकार, अमाेल गाेसाई व काेतवाल रुपेश पानघाटे यांनी जिव धाेक्यात घालुन संयुक्तिकरित्या केल्या आहे. शेती उपयाेगासाठी या वाहनांचा परवाना असुन त्यांनी या ट्रॅक्टर वापर अवैध रेती नेण्यासाठी केला असल्याची बाब ही समाेर आली आहे. विशेष म्हणजे या वाहनांना कुठलाही क्रमांक नसल्याचे दिसून येते.अश्या वाहनांवर आरटीआे यांनी कारवाया कराव्या अशी मागणी देखिल या परिसरातील जनतेंनी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकणातील एका रेती तस्करांने भाडे तत्वावर ट्रॅक्टर घेवून अवैध रेती नेण्यांचा सपाटा लावला हाेता परंतु त्याचे नशिबाने त्याला साथ दिली नाही. त्याच ट्रॅक्टरला महसुल विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले असल्याचे पथकातील एका कर्मचा-यांने आज सांगितले. दरम्यान जप्तीतील एक वाहन पाेलिस पाटील माराेती राऊत यांचे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आले आहे.उपरोक्त कारवाया राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली महसुल विभागाच्या पथकाने केल्या आहे. सदरहु वाहने अनुक्रमे शिवराम शंकर आडे व रमेश उध्दव गाैरकर यांचे मालकीचे असल्याचे समजते. जप्तीतील दुसरे वाहन रात्री उशिरा काेरपना तहसील कार्यालयात जमा करण्यांत आल्याचे समजते.
या सततच्या कारवायामुळे रेती माफियांत चांगलीच खळबळ उडाली आहे तर राेजंदारीवर पाळत ठेवणा-यांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे.
रात्रीच्या वेळी महसुल पथकावर पाळत ठेवणारे गेले झाेपी अन् जाळ्यात अडकले अवैध रेतीचे दाेन ट्रैक्टर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 31, 2022
Rating:
