सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिं 25 जाने 2022 ला मतदार दिनानिमित्त भाषण व ई -घोषवाक्य कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये कु. आचल किन्हेकार, तेजस्वी वांढरे व शुभांगी मुंघाटे आदींनी मी मताधिकार बजावतो या विषयावर भाषण दिले तसेच इतर रासेयो विद्यार्थ्यांकडून ई - घोषवाक्य लिहून घेऊन समाजामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी हाच एक उद्देश प्रत्येकानी मनाशी बाळगला. प्रसंगी रासेयो विद्यार्थिनी कु. आचल प्रवीण किन्हेकार हिने SPM महाविद्यालय, चिखली द्वारे मतदान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले या विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी अभिनंदन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेकारिता रासेयो कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब देशमुख व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भगत सर आणि शेंडे मॅडम यांनी पुढाकार घेतला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 31, 2022
Rating:
