राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा गठीत, प.स. उपसभापती यांच्या हस्ते झाले शाखा फलकाचे उद्घाटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा गठीत करून शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. संत रविदास महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण करून पंचायत समितीच्या उपसभापती चंद्रज्योती शेंडे यांच्या हस्ते या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. नांदेपेरा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाची तालुक्यातील ही चौथी शाखा असून २९ जानेवारीला चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. नरेश खडतरे यांच्या मार्गदर्शनात ही शाखा स्थापन करण्यात आली आहे. देशभरातील चर्मकार बांधवांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ सर्वपरिचित आहे. 

शाखा फलकाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी उदघाटक म्हणून प.स. उपसभापती चंद्रज्योती शेंडे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, नांदेपेराचे सरपंच विलास चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण खामनकर, जेष्ठ सदस्य सुखदेव येरेकार, भास्कर खोले, पांडुरंग खोले, पंढरी बोधे यांची उपस्थिती लाभली. तसेच या शाखा उद्घाटन प्रसंगी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी चे संस्थापक सदस्य विनोद ढेरे, किशन कोरडे, श्याम गिरडकर, भालर शाखेचे सचिव पंकज वादेकर व समाज बांधव उपस्थित होते. 

नांदेपेरा शाखेचे शाखा अध्यक्ष म्हणून रामा कोल्हे, उपाध्यक्ष प्रविण खोले तर सचिव पदी विकास खोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन देविदास खोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव, समाजातील महिला व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा गठीत, प.स. उपसभापती यांच्या हस्ते झाले शाखा फलकाचे उद्घाटन राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नांदेपेरा येथे शाखा गठीत, प.स. उपसभापती यांच्या हस्ते झाले शाखा फलकाचे उद्घाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2022 Rating: 5
Powered by Blogger.