खनिज निरीक्षक बंडू वरखेडेंसह खनिकर्म पथकाने पकडले रात्रीला अवैध गाैण खनिज वाहने !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे  

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दि. २९ जानेवारीला रात्री ११ नंतर लक्कडकाेट मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे व प्राणाची पर्वा न करता अवैध गाैण खनिजाची वाहने खनिज निरीक्षक बंडु वरखेडे व त्यांचे पथकाने पकडल्याचे वृत्त आहे. 

जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी या पूर्विच आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अश्या अवैध गाैण खनिज वाहनांवर माेठ्या प्रमाणात कारवायां करीत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येते. दरम्यान या दाेन्ही वाहनांचे चालक कुठलेही गाैण परवाने नसतांना सर्रासपणे गिट्टीची वाहतुक करीत हाेते. वाहन चालक प्रमाेद जैस्वाल (मध्यप्रदेश) व मोहम्मद हासीन खाँन (उत्तर प्रदेश) यांनी जप्तीनामावर आपली स्वाक्षरी केली असुन ही जप्तीतील गिट्टीची दाेन्ही वाहने राजूरा तालुक्यातील लक्कडकाेटचे पाेलिस पाटील देविदास फकरु कातकर यांचे सुपुर्द नाम्यावर देण्यांत आलेली आहे यातील वाहनाचे क्रमांक एम.एच २३ ऐयु २४९३ व एम.एच.२३ऐयु २६१० अशी आहे. या धडक कारवाया मुळे अवैधरित्या गाैण खनिजांची वाहतुक करणा-या तस्करांत अक्षरशः खळबळ उडाली आहे. दाेन दिवसांपुर्विच जिवतीचे प्रभारी तहसीलदार प्रविण चिडे व काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध रेती तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.

वेळ प्रसंगी त्यांनी मुजाेर व अरेरावी करणा-या रेती तस्करांवर पाेलिस कारवाया देखिल केल्या आहे तर खनिकर्म विभागाने काल रात्री केलेल्या कारवायांचे जनतेनी स्वागत केले आहे. अवैध गाैण खनिजांच्या बाबतीत काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांच्या कारवायां सातत्याने सुरु आहे.हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.
  
खनिज निरीक्षक बंडू वरखेडेंसह खनिकर्म पथकाने पकडले रात्रीला अवैध गाैण खनिज वाहने ! खनिज निरीक्षक बंडू वरखेडेंसह खनिकर्म पथकाने पकडले रात्रीला अवैध गाैण खनिज वाहने ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 31, 2022 Rating: 5
Powered by Blogger.