मोची, मादगी, मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्राच्या गोंडपिपरी तालुकाध्यक्ष पदी नागेश इटेकर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : रविवार दि. २ जानेवा रोजी चंद्रपूरच्या शासकीय विश्रामगृहात मोची,मादगी,मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर तथा मेळावा पार पडला.

कार्यक्रमात जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या,त्यात गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पदाची धुरा सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणारे पत्रकार नागेश इटेकर यांचेवर सोपविण्यात आली. इटेकरांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाली हे कळताच तालुक्यातील मादगी समाज बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष नागेश इटेकर यांचे स्थानिक पंचशील वार्डात फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाचे जेष्ठ नेते तथा समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : सावित्रिबाई फुले यांची जयंती काल साेमवारी भीम ज्याेती बुध्द विहार मंडळ भिवापूर वार्ड चंद्रपूरच्या वतीने साजरी करण्यांत आली.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने संघमित्रा मावलीकर, सुविद्या बांबाेडे, ममता घाेनमाेडे, पुष्पा पेंदाम, ललिता गेडाम, करुणा जिवने, आशा लाभाणे कल्पना अलाेने स्वरुपा रामटेके व मेघा चहांदे उपस्थित हाेत्या.

उपराेक्त कार्यक्रमाच्या निमित्त्याने गित गायनासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले हाेते .या स्पर्धांना महिलावर्गांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

भविष्यात विधवा वृध्द महिलांसाठी वृध्दाश्रमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न- रंजना झाडे

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : भविष्यात विधवा व्रूध्द महिलांसाठी व्रूध्दश्रमाची निर्मिती करण्यांचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे मत परिवर्तन बाैध्द महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना झाडे यांनी व्यक्त केले. त्या नकाेडा येथील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाेलत हाेत्या. स्थानिक परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती काल सोमवार (ता.३ जाने.) ला नकोडा येथे साजरी करण्यात आली.

सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर शहर संघटीका महिला वंदना हातगांवकर यांनी विभूषित केले हाेते. त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर प्रकाशझाेत टाकला. याच कार्यक्रमात परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या वतीने विधवा महिलांना
साडी चोळी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी ग्रामपंचायत सदस्या रंजना झाडे या शिवाय मंडळाच्या सचिव पुष्पांजली काटकर, मंडळाच्या उपाध्यक्षा शोभा रंगारी, कोषाध्यक्षा माधवी भगत, सदस्या भारती ठमके, उज्वला ठमके, किरण कांबळे, संघरत्ना ठमके उज्वला पाटील वंदना लोहकरे, माला पेंदोर, मिरा कुळे तसेच ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे आदीं उपस्थित हाेत्या.

 परिवर्तन बौध्द महिला मंडळाच्या माध्यमांतुन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना रंजना झाडे यांनी या वेळी जाहिर केली. माधवी भगत यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील महिला माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.

शालेय मुलींच्या सायकलींचा व्यापारी वर्गांना होतोय त्रास

सह्याद्री न्यूज | विलास पिसे
नेरी- बाहेर गावातील प्रत्येक पाच किलोमीटरच्या अंतर्गत ज्या गावांमध्ये बस जात नाही अशा गावातील वर्ग 8 ते 12 वी च्या वर्गातील मुलींना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी मानव विकास अंतर्गत आठवी ते बारावी या मुलींना सायकलचे वाटप शालेय अंतर्गत करण्यात आले या वेळी मुलींना बाहेर गाव वरून सायकलने शिक्षण घेण्यासाठी सायकलने येतात तेव्हा त्या सायकली बाजार चौकात दुकानाच्या समोर लावून अस्ताव्यस्त ठेवतात याचा नाहक त्रास हा व्यापारी वर्गांना दुकान खोलताना होतो शाळेतील विद्यार्थिनी आपल्या सायकली शाळेत नेण्याचे करावे आणि शाळेत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही या विषयी व्यापारी मंडळाने शाळेतील प्रत्येक प्रिन्सिपल ला पूर्वसूचना देण्यात आली असताना सुद्धा हा प्रकार बंद झाला नाही आणि याकडे लक्ष दिले नाही तर कदाचितअनुचित प्रकार सुद्धा घडू शकतो कारण की बाहेर गावातील मुलीं हया सायकल शाळेत न ठेवता बाजार चौकात ठेवतात आणि शाळेतून सुट्टी न काढून परस्पर ही कुठे पण जाऊ शकतात त्यामुळे शाळेत सायकल ठेवायला हवी हा प्रकार जर बंद झाला नाही तर याची तक्रार शालेय विभाग चंद्रपूर यांच्याकडे करण्यात येईल अशी व्यापारी वर्गातील मंडळी बोलत आहेत.

तुलसी अलाम आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात.


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद मधून तुलसी अलाम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्याचे समाधान करण्यात अपयशी ठरले. तुलसी अलाम बोर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे. गेल्हा पाच वर्षापासून तुलसी सामाजिक कार्यात व राजकारणात सक्रिय आहेत.

स्वताच्या ने्तृत्वाच्या व कामाच्या जोरावर वरोरा तालुका अध्यक्ष, वरोरा विधानसभा महासचिव, जिल्हा अध्यक्ष, वरोरा,भद्रावती, चिमूर पदा पर्यंत मजल गाठली आहे.
तालुक्यातच नाहीतर जिल्हात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.

सामाजिक कार्य करत आहे युवकांना एकत्र घेत दिशा देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतकऱ्याचे कोणतेही काम असो त्यासाठी तुलसी कोणत्याही परिस्थितीत त्याचे काम करून देतो कित्येक शेतकऱ्याचे थकलेले हप्ते. विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा पाठपुरावा करून नसेल ऐकत तर आंदोलनाचा इशारादेत मागण्या पूर्ण केल्या अपगाच्या निधी असो त्याचे प्रश्न असो, निराधार लोकांचे आधार तुलसी झाला आहे परिसरातीलच नाही तर तालुक्यातील प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. राजकारणाऱ्या माध्यमातुन सामाजिक कार्य कसे करता येणार यासाठी ते प्रयत्नशील असतात. लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊन मध्ये मजुरांना अन्न धान्य किट वाटप केले. वेगळया वेगळया प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली. गावाचा सर्वागीन विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत. कोणताही व्यक्ती त्याच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत.

लोकांच्या मनात त्याची वेगळी छाप पडली आहे. सर्व सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्ती, निराधार यांचा तुलसीला पाठींबा आहे. युवकांमध्ये तुलसीचे ने्तृत्व डोक्यावर घेतले आहे अनेक युवक त्याच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.

आपल्या आगळया वेगळया प्रकारची आंदोलन करून ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात. अधिकाऱ्यावर त्याची वचक आहे. कारण ते अभ्यासु कार्यश्रम व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबल त्याच्या पाठीशी आहे.

तुलसीने निवडणूकीत मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे कोणत्याही क्षेत्रात ने्तृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्विकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय...... याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करतात. सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी तुलसी जीवाचे रान करून घेतो.