तुलसी अलाम आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात.


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वरोरा : जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच बोर्डा-शेगाव जिल्हा परिषद मधून तुलसी अलाम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्याचे समाधान करण्यात अपयशी ठरले. तुलसी अलाम बोर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे. गेल्हा पाच वर्षापासून तुलसी सामाजिक कार्यात व राजकारणात सक्रिय आहेत.

स्वताच्या ने्तृत्वाच्या व कामाच्या जोरावर वरोरा तालुका अध्यक्ष, वरोरा विधानसभा महासचिव, जिल्हा अध्यक्ष, वरोरा,भद्रावती, चिमूर पदा पर्यंत मजल गाठली आहे.
तालुक्यातच नाहीतर जिल्हात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.

सामाजिक कार्य करत आहे युवकांना एकत्र घेत दिशा देण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतकऱ्याचे कोणतेही काम असो त्यासाठी तुलसी कोणत्याही परिस्थितीत त्याचे काम करून देतो कित्येक शेतकऱ्याचे थकलेले हप्ते. विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्याशी चर्चा पाठपुरावा करून नसेल ऐकत तर आंदोलनाचा इशारादेत मागण्या पूर्ण केल्या अपगाच्या निधी असो त्याचे प्रश्न असो, निराधार लोकांचे आधार तुलसी झाला आहे परिसरातीलच नाही तर तालुक्यातील प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. राजकारणाऱ्या माध्यमातुन सामाजिक कार्य कसे करता येणार यासाठी ते प्रयत्नशील असतात. लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊन मध्ये मजुरांना अन्न धान्य किट वाटप केले. वेगळया वेगळया प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली. गावाचा सर्वागीन विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत. कोणताही व्यक्ती त्याच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत.

लोकांच्या मनात त्याची वेगळी छाप पडली आहे. सर्व सामान्य माणसाला शेतकरी अपंग व्यक्ती, निराधार यांचा तुलसीला पाठींबा आहे. युवकांमध्ये तुलसीचे ने्तृत्व डोक्यावर घेतले आहे अनेक युवक त्याच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत.

आपल्या आगळया वेगळया प्रकारची आंदोलन करून ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात. अधिकाऱ्यावर त्याची वचक आहे. कारण ते अभ्यासु कार्यश्रम व्यक्तिमत्व आहे. संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबल त्याच्या पाठीशी आहे.

तुलसीने निवडणूकीत मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे कोणत्याही क्षेत्रात ने्तृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्विकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय...... याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करतात. सर्व सामान्य कुटूंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी तुलसी जीवाचे रान करून घेतो.
तुलसी अलाम आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात. तुलसी अलाम आता प्रस्थापित नेत्यांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात. Reviewed by सह्याद्री चौफेर on January 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.