सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही हेमंत यांनी आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीत अभ्यास करत, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) कठीण परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण मारेगाव तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
हेमंत बुजाडे यांच्या या प्रेरणादायी यशाची दखल घेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज भैया अहिर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन हेमंत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते माधव कोहळे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, नंदू खापणे, पांडुरंग उंबरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.