टॉप बातम्या

उपक्रमशील शिक्षक दिलीप कोरपेनवार यांच्या स्मृतींना उजाळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : उपक्रमशील शिक्षक तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार ह्यांचे मागील वर्षी २० जुलै रोजी अपघाती निधन झाले. त्यावेळी ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. आठ येथे कार्यरत होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी परिसरात अशोकाचा वृक्ष लावण्यात आला. 

माजी विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश बोबडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली हा छोटेखानी सोहळा झाला. यावेळी नम्रता दिलीप कोरपेनवार, रोहन दिलीप कोरपेनवार, अस्मिता दिलीप कोरपेनवार, शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे, साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे, शाळेचे शिक्षक काकासाहेब जायभाये, अविनाश तुंबडे, सुनिता जकाते, किरण जगताप, नीलिमा राऊत, दीपक भोयर, निशा कावडे तथा स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव उपस्थित होते.

दिलीप कोरपेनवार हे नगरसेवा समितीचे अध्यक्ष होते. समितीच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. त्यांनी अनेक गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदतही केली होती. स्माईल फाउंडेशनने यावेळी वृक्ष आणि ट्रीगार्ड दिला. यावेळी मान्यवरांसह शाळेचे विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();