टॉप बातम्या

आता मघार नाही आता निर्णयचं होणार;उपविभागातील अनागोंदी समस्याचा पाढा जिल्हाधिकारी यांच्या दालनात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी :- सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा,सोनापूर, पळसोनी, मेघदूत, कळमना (लालपुलिया) व चिखलगाव येथील नागरिक आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, सोमनाळा ते चिखलगाव चौफुली या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात कोल डेपो व कोलवॉशरी, डोलोमाईट भट्टे कार्यरत असून ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ व प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून श्वसनाचे आजार, धुळीमुळे होणारे विविध आजार तसेच वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. 
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने वाहतूक होत असून काही वाहने उलट दिशेने धावत असल्यामुळे गंभीर अपघात होत आहेत व समोर सुद्धा होणार आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. 

(1) निवेदन दिल्याच्या तारखेपासून 10 दिवसात सर्व संबंधित विभागीची आपल्या दालनात बैठक लावण्यात यावी 
(2) बैठकीत ह्या विषयावर तोडगा निघाला नाही तर पर्यायी आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल यांची नोंद घ्यावी 

 -खालीलप्रमाणे मागण्या:
1. सोमनाळा ते चिखलगाव चौफुली या मुख्य रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक (स्पीड ब्रेकर), रस्ता दुभाजक (डिव्हायडर), परावर्तित दिशादर्शक फलक, चेतावणी फलक व रस्ता सुरक्षा चिन्हे तातडीने बसविण्यात यावीत.

2. कळमना (लालपुलिया) येथे जिल्हा परिषद हिंदी शाळा आहेत त्याठीकानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एस.टी.) अधिकृत बस थांबा मंजूर करण्यात यावा.
3. चिखलगाव चौफुली येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करून वाहतूक सिग्नल बसविण्यात यावा तसेच पोलीस मदत केंद्र/पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी.

4. निवासी उपयोगासाठी मंजूर लेआऊटमध्ये व्यावसायिक कोल डेपो सुरू करण्यास परवानगी कोणत्या सक्षम प्राधिकरणाने दिली याची चौकशी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
5. ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने उभी राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
6.उलट दिशेने (Wrong Side) होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

सर्व अनधिकृत व नियमबाह्य कोल डेपो तात्काळ हटविण्यात यावेत. अन्यथा संबंधित डेपो चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करून प्रशासनाने ते हटवावेत.कोल डेपो, प्रदूषण व पर्यावरणविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वणी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीची कायमस्वरूपी नियुक्ती अथवा नियमित उपस्थितीची व्यवस्था करण्यात यावी.

ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर नियमित वजन तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी.

कोल डेपो व वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी फवारणी, झाकून वाहतूक, प्रदूषण नियंत्रणाची साधने व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात यावे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त समितीद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करून अहवाल सादर करण्यात यावा.

या निवेदनातील सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांच्या जीवित, आरोग्य, पर्यावरण व सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
वरील मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल, याची कृपया नोंद घ्यावी.

निवेदन देताना सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर,भांडेवाडा, बोडाद सोनापूर पळसोनी, मेघदूत कालनी,कळमना (लालपुलिया) व चिखलगाव येथील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आले यावेळी प्रवीण खानझोडे राहुल क्षीरसागर कळमना, राहुल कुत्तरमारे सोमनाळा, अनिल डवरे राजूर, मनोज ढेंगळे निंबाळा, ऍड कुमार मोहरमपुरी ऍड अरविंद सिडाम. मारोती आत्राम,सुभाष लसंते निंबाळा, तुकाराम माथणकर मानकी सरपंच, शिवाजीं मोरे, अतुल चांदेकर,मेघदूत कालानी,इमामुल हुसेन मेघदूत कालनि , प्रकाश भट पळसोनी, आशिष रिंगोले, लेजू मडावी कळमना,क्रिष्णा चलाख पळसोनी, मंगेश येटे कळमना, राजेश चांदेकर कळमना,शंकर धांडे कळमना ,आकाश दुबे, जफर खान. अशोक अंकतवार, संजय जाधव, रोशन गारपेलिवार, नागरिक उपस्थित होते
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();