टॉप बातम्या

जागतिक आदिवासी दिना निमित्त कळंब येथे वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

कळंब : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मददगार फाऊंडेशन व कोया पुनेम गोटुल समिती, यवतमाळ (तालुका शाखा कळंब) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जुनी पंचायत समिती कार्यालय परिसर, कळंब येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार धिरज स्थुल, गटविकास अधिकारी अजय चव्हाण, ठाणेदार धनराज निळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय केराम (जोडमोहा), अभियंता प्रशांत डेहणकर तसेच सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक सहभागाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजक रुस्तम शेख, प्रशांत सोयाम, गजानन येरकाडे, कुणाल जुमनाके, सुमित सोयाम, सागर वादाफळे, अभियंता मनोहर शहारे, अब्दुल अजीज (अज्जुभाई) – माजी नगरसेवक, रविंद्र दिडपाये, कामील शेख, प्रभाकर गेडाम, चंदाताई आत्राम, रितेश पंधरे, नामदेवराव आत्राम, शेख अजहर, हरीष बोंदरे, उमेश वागदे, चेतन भोयर (सावरगाव) आणि सतीश कडू यांनी केले आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();