टॉप बातम्या

मच्छिन्द्रा–नांदेपेरा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा जीव धोक्यात

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

मारेगाव : वणी–नांदेपेरा ते मच्छिन्द्रा हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची आणखी दुरवस्था झाली असून दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने तसेच मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खोल खड्डे चुकवत वाहन चालविण्याची वेळ चालकांवर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत आहे.

पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचले की,त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अचानक वाहनाचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. रात्रीच्या वेळी आणि कमी दृश्यमानतेत ही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

वारंवार माध्यमातून वृत्तांकन करूनही संबंधित विभागाकडून या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नाराजी स्थानिक नागरिकांनी केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();