सह्याद्री न्यूज | विलास पिसे
नेरी- बाहेर गावातील प्रत्येक पाच किलोमीटरच्या अंतर्गत ज्या गावांमध्ये बस जात नाही अशा गावातील वर्ग 8 ते 12 वी च्या वर्गातील मुलींना शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी मानव विकास अंतर्गत आठवी ते बारावी या मुलींना सायकलचे वाटप शालेय अंतर्गत करण्यात आले या वेळी मुलींना बाहेर गाव वरून सायकलने शिक्षण घेण्यासाठी सायकलने येतात तेव्हा त्या सायकली बाजार चौकात दुकानाच्या समोर लावून अस्ताव्यस्त ठेवतात याचा नाहक त्रास हा व्यापारी वर्गांना दुकान खोलताना होतो शाळेतील विद्यार्थिनी आपल्या सायकली शाळेत नेण्याचे करावे आणि शाळेत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही या विषयी व्यापारी मंडळाने शाळेतील प्रत्येक प्रिन्सिपल ला पूर्वसूचना देण्यात आली असताना सुद्धा हा प्रकार बंद झाला नाही आणि याकडे लक्ष दिले नाही तर कदाचितअनुचित प्रकार सुद्धा घडू शकतो कारण की बाहेर गावातील मुलीं हया सायकल शाळेत न ठेवता बाजार चौकात ठेवतात आणि शाळेतून सुट्टी न काढून परस्पर ही कुठे पण जाऊ शकतात त्यामुळे शाळेत सायकल ठेवायला हवी हा प्रकार जर बंद झाला नाही तर याची तक्रार शालेय विभाग चंद्रपूर यांच्याकडे करण्यात येईल अशी व्यापारी वर्गातील मंडळी बोलत आहेत.
शालेय मुलींच्या सायकलींचा व्यापारी वर्गांना होतोय त्रास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 04, 2022
Rating:
