सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : भविष्यात विधवा व्रूध्द महिलांसाठी व्रूध्दश्रमाची निर्मिती करण्यांचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे मत परिवर्तन बाैध्द महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना झाडे यांनी व्यक्त केले. त्या नकाेडा येथील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाेलत हाेत्या. स्थानिक परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती काल सोमवार (ता.३ जाने.) ला नकोडा येथे साजरी करण्यात आली.
सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर शहर संघटीका महिला वंदना हातगांवकर यांनी विभूषित केले हाेते. त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्यावर प्रकाशझाेत टाकला. याच कार्यक्रमात परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या वतीने विधवा महिलांना
साडी चोळी देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला परिवर्तन बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी ग्रामपंचायत सदस्या रंजना झाडे या शिवाय मंडळाच्या सचिव पुष्पांजली काटकर, मंडळाच्या उपाध्यक्षा शोभा रंगारी, कोषाध्यक्षा माधवी भगत, सदस्या भारती ठमके, उज्वला ठमके, किरण कांबळे, संघरत्ना ठमके उज्वला पाटील वंदना लोहकरे, माला पेंदोर, मिरा कुळे तसेच ग्रामपंचायत सदस्या ममता मोरे आदीं उपस्थित हाेत्या.
परिवर्तन बौध्द महिला मंडळाच्या माध्यमांतुन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना रंजना झाडे यांनी या वेळी जाहिर केली. माधवी भगत यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील महिला माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.
भविष्यात विधवा वृध्द महिलांसाठी वृध्दाश्रमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न- रंजना झाडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 04, 2022
Rating:
