टॉप बातम्या

मोची, मादगी, मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्राच्या गोंडपिपरी तालुकाध्यक्ष पदी नागेश इटेकर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : रविवार दि. २ जानेवा रोजी चंद्रपूरच्या शासकीय विश्रामगृहात मोची,मादगी,मादरू,मादिगा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने समाज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर तथा मेळावा पार पडला.

कार्यक्रमात जिल्हा तसेच तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या,त्यात गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पदाची धुरा सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणारे पत्रकार नागेश इटेकर यांचेवर सोपविण्यात आली. इटेकरांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाली हे कळताच तालुक्यातील मादगी समाज बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष नागेश इटेकर यांचे स्थानिक पंचशील वार्डात फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाचे जेष्ठ नेते तथा समाज बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();