सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : तालुक्यात सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागली आहे. मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) व आपटी येथील रेती घाटातून ओव्हरलोड रेतीची वाहतूक मुळे देवी वनोजा मार्ग उखडून गेला असतांनाही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर वनोजा ग्रामस्थांनी मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वनोजा देवी मार्गाने ओव्हरलोड वाहतूक थांबवावी किंबहुना दहा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता आधी तयार करावा अशी मागणी करण्यात आली.
आता आपटी येथील रेती घाटाचा लिलाव होत असून यापुढे रेती भरून ओव्हरलोड वाहने सदर रस्त्याने जाऊन सध्याच्या परिस्थिती पेक्षाही या रोडची पुन्हा दुर्दशा होणार आहे. शिवाय आपटी घाटावरून रेतीचे चालणाऱ्या ओव्हरलोड ट्रक, ट्रॅकटर, हायवामुळे संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर ठिकठिकाणी भल्ले खड्डे पडले असून या मार्गाने नागरिकांना प्रवास करण्याकरिता मोठी तारेवरची कसरत करावी लागतेय. मोठी अडचण निर्माण झाली असून दैनंदिन येरजाऱ्या करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सदर खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनातून म्हटले आहे. पुढे असेही नमूद केले की, गावातील बिमार व्यक्तीला शहराचे ठिकाणी घेवुन जाणे अतिशय कठीण बाब झाली आहे.
रेतीसह ओव्हरलोड वाहतूक सुरु असून क्षमतेपेक्षा अती जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करावी. अतीजास्त वजनाचा माल ट्रकांमध्ये वाहून नेला जातो. त्यामुळे वनोजा देवी या दोन किमी पर्यंतचा रस्ता हा दहा ते पंधरा फूट रुंदी चा तयार करून द्यावा. अशी येथील गावाकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही गावकरी घाटावरून रेती भरून येणारी वाहने अडवून चक्का जाम करु असा इशाराच दिला आहे.
आज रोजी निवेदन देताना मनसे विभाग प्रमुख रोशन शिंदे, यांच्यासह विठ्ठल ढोके, प्रशांत बोढे, प्रवीण राजूरकर, सुधाकर धांडे, गौरव नगराळे, राजू मत्ते, मनोहर दारुणकर, विलास बरडे, भूषण वैद्य, संदीप बरडे, रामकृष्ण राजूरकर, रोशन आस्वले, पांडुरंग राजूरकर, राजेंद्र मिलमिले यांची उपस्थित होती.
ओव्हरलोड वाहतूकीने वनोजा देवी रस्त्याची झाली दयनीय अवस्था
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 04, 2022
Rating:
