छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळील सवित्रीबाई फुले चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ असलेल्या सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नगर सेवा स्वच्छता समिती वणी व I Can करियर अकादमी यांच्या विद्यमाने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पन करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळ पासूनच नगर सेवा समिती व अकादमीच्या चमुने चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर सावित्रीबाई फुले चौकात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अशिक्षीत स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आनणारया सवित्रीबाई यांनी स्त्रियांचं भाग्यच उजळलं. स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करुन दिले. स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवनारया सावित्रीबाईंच्या समाजकार्याची जाणीव ठेऊन स्त्रियांनी नेहमी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे मनोगत उपस्थीत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी गिरिजा धोटे, ज्योती ढाले (साखरकर), यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन त्यांनी स्त्री शिक्षणासाठी उभारलेलया लढ्यावार प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शिक्षण गट समन्वयक गणेश निकोले, केंद्र प्रमुख बोबडे, कांबळे गुरूजी, नगर सेवा स्वच्छता समितीचे नामदेव शेलवडे, दिनकर ढवस, राजेंद्र साखरकर, महेश लिपटे, करियर अकादमीचे सोपान लाड, गणेश आसुटकर, योगेंद्र शेंडे, योगिता पारखी, विजया जुनगरे, छबूताई धोटे प्रामुख्याने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी खिरेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रणिता उईके यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नगर सेवा स्वच्छता समिती व करियर अकादमीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

नरसाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची नियमबाह्य निवड; समिती रद्द करण्यासाठी पालकांनी दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेशा वरून येथील मुख्याध्यापिका निर्मला रोगे यांनी समितीची निवड असल्याबाबत सर्व पालकांना नोटीस देवून ३१ डिसेंबर २०२१ रोजी शाळेच्या आवारात सभेसाठी बोलावण्यात आले होते. व त्या सभेतून नवीन समिती तयार करण्यात सुध्दा आली होती. व वृत्तपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, ती समितीच नियमबाह्य करण्यात आली असल्याबाबतची तक्रार सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या पालकांचीच ओरड असून, त्या पालकांनी निवड समिती रद्द करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार केली आहेत.

दिलेल्या तक्रारीत त्यांचे म्हणणे असे आहेत की, समितीची निवड करीत असताना पालकांची कमीतकमी ७५ टक्केच्या उपस्थीतीत निवड करणे बंधनकारक असताना त्या पध्दतीने निवड केल्या गेली नाहीत. त्या मुळे अनेक पालकांना त्या पासून वंचित राहावे लागलेत. त्यांच्या अधिकारावर शाळेने पाणी फिरवले. शाळा समितीत अध्यक्षाची निवड करीत असताना निवड झालेल्या सदस्य लोकांना कोणतीच तशी सूचना न करता एकमतांनी अध्यक्षाची निवड घोषित केली. तसेच अंगणवाडी मदतनीस ही उपाध्यक्ष पदी राहू शकत नाहीत. तशी तिची निवड करून एका पालकांना अधिकारापासून वंचित केलेत. समिती गठित करीत असताना आरक्षण पाहून न करता चुकीची सदस्य निवड करण्यात आली. सर्वसाधारण लोककरीता निवडीतुन निवड करण्याची संधी देण्यात आली नाहीत. विशेष महत्वाची बाब म्हणजे अध्यक्षाची निवड ही सर्व निवड केलेल्या सदस्यातून करणे कायदेशीर असताना सुध्दा त्यांनी वर्ग ७ च्या पालकांना बोलावून त्यांच्यातून अध्यक्षाची निवड केली ही बाब नियमबाह्य आहेत. बाकी इतरही सदस्यांना त्या पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला व आपल्या जवळील व्यक्तींना पदावर बसण्यासाठी डाव रचला. हे कृत्य गावाच्या दृष्टीने योग्य नाहीत. करीता तक्रारीची तात्काळ दाखल घेवून ही समिती रद्द करण्यात यावी, अशी दिलेल्या निवेदनातून केली आहे. नुकतीच समिती गठीत झालेली रद्द न केल्यास आम्ही पालक मोर्चे, आंदोलन करू असा इशारा निवेदनातुन तक्रार कर्त्यानी दिला आहेत. या निवेदनात निवड झालेल्या सदस्य व २९ पालकांच्या सह्या आहेत. संबंधित अधिकारी या निवेदनावर काय कार्यवाही करतात. या कडे सर्व पालकांचे लक्ष वेधले आहे.

आदिवासी युवकांना वन विभागाच्या कर्मचा-यांची बेदम मारहाण


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ताडोबा बफर झोन अंतर्गत मूल तालुक्यातील फुलझरी व डोनी या गावातील आदिवासी युवक फुलझरी वरून डोनीला जात असताना अचानक त्यांची गाडी खराब झाली. त्यामध्ये आशिष नैताम, भारत कोवे, मनोज मरापे हे तिघे आदिवासी युवक होते. भारत कोवे हा पायदळ वाटेत जात असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना ३० डिसेंबरला घडली व सदरहु प्रकरण ३१ डिसेंबरला उघडकीस आले.
         
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान वनक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर व उपक्षेत्र अधिकारी धुर्वे, त्यांचे अन्य अधिकारी व कर्मचारी फुलझरी व डोनी येथील युवकांना रात्री घरात घुसून व त्यांना उचलून जबरदस्तीने ओढत नेऊन गाडीत कोंबले व त्यांना जंगलात नेऊन तुम्हीच भारत कोवे या युवकाचा खून केला असे बयान पोलिसांना द्या ! अशी जबरदस्ती केली व अमानुषपणे मारहाण केली. वाघाचा हल्ला केल्याची घटना दाबून टाकण्यासाठी क्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेदम अमानुष मारहाण केली. गावकऱ्यांनी सदरहु प्रकरण उचलून धरताच प्रकरण वन विभागाच्या व आपल्या अंगलट येईल असा प्रकार दिसताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी युवकांच्या घरी जाऊन हात पाय जोडून प्रकरण मागे घेण्याची विनवणी केली. केस मागे न घेतल्यास गावकऱ्यांना व आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या दिलेल्या जमिनी परत घेऊन वन कायद्याअंतर्गत गावकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात आम्ही अटकवू शकतो अशा अनेक धमक्या देखिल उपक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदिवासींना व गावकऱ्यांना सातत्याने देत आहेत. उपरोक्त घटनेची बातमी गावकऱ्यांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांना कळविताच त्यांनी डोनी व फुलझरी या गावांना भेट दिली व दुसऱ्याच दिवशी जिल्हा कचेरीवर संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन न्याय मिळवण्यासाठी निवेदन दिले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार करणाऱ्या व अमानुष मारहाण करणांऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनात केली सदरहु प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत गावकरी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जर मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर उलगुलान कामगार संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टी तीव्र आंदोलन करणार असा इशारा सुध्दा देण्यात आला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, डोनी येथील उपसरपंच विकास कुडमेथे, जितेंद्र बोरुले, आशिष नैताम, संपत कोरडे, गौतम गेडाम तथा अन्य गावकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला सावित्रींच्या लेकिंचा सन्मान

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : येथिल शाळा महाविद्यालय व शहरात ठिकठिकाणी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक 8 मध्येही स्त्री शिक्षणाची जनक असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंती निमीत्त स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला हारार्पन करुन दिप प्रज्वलन केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रिच्या लेकिंचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने साळी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले यांची उत्तम वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींना शाळा व्यवस्थापनाकडून भेट वस्तू देण्यात आल्या. 
ज्या काळात महिला व मुलींना शिक्षणाचे दरवाजे बंद होते, त्याकाळात महिलांना शिक्षित करण्याचा विडा उचलणारया सावित्रीबाईंना अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. तरीही महिलांसाठी त्यांनी शाळा सुरु करुन महिलांना शिक्षणाची वाट मोकळी करुन दिली. आज महिला शिक्षण घेत आहेत, ही सावित्रीबाईंचीच पुण्याई आहे. त्या जशा समाजसेवेसाठी झटल्या तशीच आजच्या महिला व मुलींनी समाजसेवेची भावना जोपसली पाहिजे, असे मनोगत प्रशासन अधिकारी चवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिना निमीत्त सावित्रीच्या लेकिंचा सन्मान करतांना व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व समाजसेविका प्रतिभा मानकर यांचा त्यांच्या व मुख्याध्यापक बंडू कांबळे यांच्या हस्ते साळी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिभा मानकर यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्रमांक 8 येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका जकाते, जगताप, राऊत व मदतनीस निशा कवाडे यांचा साळी चोळी देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची उत्तम वेशभूषा साकारलेल्या रक्षा मानकर या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. यावेळी उपस्थीत मान्यवरांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन किरण जगताप यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका राऊत यांनी केले. जयंती सोहळ्याला शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग मोठ्या संखेने उपस्थीत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या सर्वच शिक्षक व कर्मचारयांनी परिश्रम घेतले.

भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची महत्त्वाची भूमिका : प्राचार्य डॉ. अ. ना. घरडे


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध कार्यक्रम घेऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्त्रियांच्या हक्कासाठी सावित्रीबाई यांचे योगदान या विषयावर आपले मत मांडले. तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. गजानन सोडणर यांनी सावित्रीबाईच्या संघर्षातून राष्ट्राउभारणी मध्ये महिलांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर उपस्थित महिला प्राध्यापिका डॉ. ताणूरकर मॅडम, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. कांबळे मॅडम आदि या सर्वांचा प्राचार्य यांच्यावतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. जयंतीचे औचित्य साधून प्रा. भगत सर व विद्यार्थ्यांच्या गीतगायनातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व बी. ए. भाग 2 व 3 यांचे सहकार्य लाभले.