क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला सावित्रींच्या लेकिंचा सन्मान
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
ज्या काळात महिला व मुलींना शिक्षणाचे दरवाजे बंद होते, त्याकाळात महिलांना शिक्षित करण्याचा विडा उचलणारया सावित्रीबाईंना अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. तरीही महिलांसाठी त्यांनी शाळा सुरु करुन महिलांना शिक्षणाची वाट मोकळी करुन दिली. आज महिला शिक्षण घेत आहेत, ही सावित्रीबाईंचीच पुण्याई आहे. त्या जशा समाजसेवेसाठी झटल्या तशीच आजच्या महिला व मुलींनी समाजसेवेची भावना जोपसली पाहिजे, असे मनोगत प्रशासन अधिकारी चवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिना निमीत्त सावित्रीच्या लेकिंचा सन्मान करतांना व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व समाजसेविका प्रतिभा मानकर यांचा त्यांच्या व मुख्याध्यापक बंडू कांबळे यांच्या हस्ते साळी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिभा मानकर यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्रमांक 8 येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका जकाते, जगताप, राऊत व मदतनीस निशा कवाडे यांचा साळी चोळी देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची उत्तम वेशभूषा साकारलेल्या रक्षा मानकर या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. यावेळी उपस्थीत मान्यवरांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन किरण जगताप यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका राऊत यांनी केले. जयंती सोहळ्याला शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग मोठ्या संखेने उपस्थीत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या सर्वच शिक्षक व कर्मचारयांनी परिश्रम घेतले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला सावित्रींच्या लेकिंचा सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
