भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची महत्त्वाची भूमिका : प्राचार्य डॉ. अ. ना. घरडे


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध कार्यक्रम घेऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्त्रियांच्या हक्कासाठी सावित्रीबाई यांचे योगदान या विषयावर आपले मत मांडले. तसेच इतिहास विभागप्रमुख डॉ. गजानन सोडणर यांनी सावित्रीबाईच्या संघर्षातून राष्ट्राउभारणी मध्ये महिलांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर उपस्थित महिला प्राध्यापिका डॉ. ताणूरकर मॅडम, डॉ. घोडखांदे मॅडम, डॉ. कांबळे मॅडम आदि या सर्वांचा प्राचार्य यांच्यावतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. जयंतीचे औचित्य साधून प्रा. भगत सर व विद्यार्थ्यांच्या गीतगायनातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व बी. ए. भाग 2 व 3 यांचे सहकार्य लाभले.
भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची महत्त्वाची भूमिका : प्राचार्य डॉ. अ. ना. घरडे भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची महत्त्वाची भूमिका : प्राचार्य डॉ. अ. ना. घरडे Reviewed by सह्याद्री चौफेर on January 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.