सह्याद्री न्यूज : शंकर घुगरे
वणी : दि.३ जानेवारी २०२२ ला शिरपूर येथील श्री गुरुदेव विद्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी वयोगट १५ ते १८ मधील तब्बल ३२० विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोज घेतला.
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हा लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपूर चे सन्माननीय सचीव मा. पुरुषोत्तमराव कोंगरे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणें प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य बंडुभाऊ चांदेकर व मा.परशराम पेंदोर, पंचायत समिती वणीच्या सदस्या सौ. वर्षाताई मोरोपंत पोतराजे, शिरपूर ग्रामपंचायत सरपंच श्री. जगदीश बोरपे, उपसरपंच श्री.मोहीत चचडा, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.प्रविणजी बोडखे, विद्यालयाचे प्राचार्य मा.ना.पुं.पिंपळकर, पर्यवेक्षक श्री. मो.ल.परचाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. ना.पु.पिंपळकर यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. गणेश लोहे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री.ना.खु.शेडामे यांनी आभारप्रदर्शन करून केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग चमू शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
श्री गुरुदेव विद्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
