सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांचा विदर्भ विभागीय संवाद दौरा सुरू आहे. त्या निमित्त अडेगाव येथे भेट देऊन यवतमाळ जिल्हाअध्यक्ष अजय धोबे यांच्या अध्यक्षतेखाली हा संवाद दौरा पार पडला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे कार्य नव्याने सांगण्याची गरज नसून तुम्ही केलेल्या कार्यातून लोक संभाजी ब्रिगेडला ओळखतात. संभाजी ब्रिगेडच्या राजकीय प्रवेशावर बोलतांना आपण जे काय काम करतो आपल्यातील जे अनेक लोक तयार झाले. आणि ते आपला विचार आपला अजेंडा ते घेऊन जाऊन आपल्या पदरात काहीतरी पाडून घेतील. आपण निर्माण केलेले सामाजिक वैचारीकतेने समाजाचा राजकीय मंडळी कडून काही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या तरुणाने दुसऱ्या कुठल्या पक्षाचा दावणीला बांधला जाऊ नये.
आपल्या पंचसूत्री मध्ये राजसत्ता हा उल्लेख पूर्वीच होता. कारण देशातील कुठल्याही प्रश्नांचे उत्तराची चाबी ही राजसत्ता आहे. आणि निकोप समाज घडविण्यासाठी ही चाबी आपल्या हाती असणे गरजेचे आहे. मागचं काही सांगण्यापेक्षा पुढं आपल्याला काय करायचं आहे हा विचार करायला हवा. संभाजी ब्रिगेड ने पहिल्याच प्रयत्नात ३५० ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी आपली ताकद दाखविली. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका सुध्दा मोठ्या ताकदीने लढविणार असल्याचे यावेळी ते बोलले.
राजकारण कश्यासाठी आपले जे मूळ प्रश्न आहे. शेतकरी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर अधिवेशनात कुणीही बोलायला तयार नाही. हे अधिवेशन कुत्रे मांजरी म्याव म्यावं करण्यात घालविल असे बोलत त्यांनी प्रस्थापितावर घोचक टीका करत आपल्या जातीची आपल्या मातीची लोक जो पर्यंत तिथे पोचत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ला मदत करण्याचे आव्हान यावेळी खेडेकर यांनी केले.
यावेळी मंचावर उपस्थित सुधीरदादा देशमुख, (संभाजी ब्रिगेड केंद्र कार्यकारिणी सदस्य) अजय धोबे (जिल्हाध्यक्ष यवतमाळ) मोहन पानघाटे, अशोक उरकुडे (पो पाटील) संतोष बरडे, पारखी सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम राऊत, प्रस्थावना समीर लेनगुरे (जिल्हा कार्याध्यक्ष)यांनी केली. तर आभार प्रदर्शन संदीप आसुटकार यांनी केले यावेळी शेकडो कार्यकर्ते व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा अडेगावात संवाद दौरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
