टॉप बातम्या

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : आज कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने एकलव्य ॲकडमी चे करियर गाईडन्स चे प्रशिक्षण देण्यात आले.

विविध उच्च शिक्षणासाठी वेगवेगळे दालन उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हेच माहित नसते त्यामुळे आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतो. परंतु आपण प्रयत्न केला तर, अशक्य काहीच नाही हेच या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.जिवन पा.कापसे तसेच एकलव्य ॲकडमी चे चव्हाण सर,तायडे सर आणि प्राचार्य हेमंत चौधरी, प्राध्यापक मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post