सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
पंचायत समिती राजुरा अंतर्गत जि प उ प्राथ शाळा कोष्ठाळा येथे पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा 'या अभियानाअंतर्गत बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वारकरी मॅडम होत्या तर श्री जनार्दन मेश्राम, श्री. विजयकुमार लांजेवार विषय शिक्षक, श्री वृक्षप्रेमी भास्कर सर, सहाय्यक शिक्षक,व श्रीमती सुरेखा मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी सौ कल्पना वारकरी मॅडम यांनी आजच्या मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे सांगितल.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थीनी कु. सिमरन शेख, कु. नाजीया शेख, कु. अल्फिया शेख, कु. गौसिया शेख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली तर ज्ञानेश्वरी तुंबडे, पलक ठाकरे, वैष्णवी जाभोर, पल्लवी एकोणकार या विध्यार्थीनीनी गीते सादर केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर संचालन व आभार प्रदर्शन शाळेतील उपक्रमशिल शिक्षक वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी केले. असे शाळेचे प्रसिद्धीप्रमुख वृक्षप्रेमी भास्कर सर कळवितात.
कोष्ठाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
