सह्याद्री न्यूज : कुमार अमोल
झरी : आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटी, लातुर द्वारा संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, मार्की बु.येथील माध्यमिक मुख्याध्यापक हसतमुख तरुण दिसणारे पंढरीनाथ राजेश्वर सोनटक्के हे दि.३१.१२.२०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्थने त्यांच्या प्रदिर्घ सेवेचा सन्मान म्हणून संस्थेचे सचिव मधुकर एकुर्केकर यांच्या वतीने त्यांचे बंधु अण्णाजी काबंळे यांनी सत्कार मूर्तीचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक मुख्याध्यापक .प्रकाश पाटील होते.
यावेळी दशरथ विधाते,अलामे, पावडे, बदकी ,सोनाळे, मॅकलवार , किनाके, सोनकाबंळे,गझलवार ,ठावरी, कु.भोयर मॅडम,कु.बावणे, छत्रपती मेंढे,शालिक बांदुरकर, गजानन मुत्यलवार, आत्माराम आत्राम, ताटेवार, दुरुडकर, बुच्चे, जांभुळकर, जुनगरी, दुर्लावार, ठाकरे, पोर्लजवार हे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून सत्कार मूर्तीच्या ३३वर्ष सेवेच्या कारकीर्दीत त्यांनी शाळा व आदिवासी विद्यार्थ्यासाठी केलेले कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यासमोर विषद केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अलामे तर आभार प्रदर्शन अमोल सोनकाबंळे यांनी केले.
तरुण मुख्यध्यापकाचा "सेवानिवृत्ती सत्कार...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
