नरसाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची नियमबाह्य निवड; समिती रद्द करण्यासाठी पालकांनी दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेशा वरून येथील मुख्याध्यापिका निर्मला रोगे यांनी समितीची निवड असल्याबाबत सर्व पालकांना नोटीस देवून ३१ डिसेंबर २०२१ रोजी शाळेच्या आवारात सभेसाठी बोलावण्यात आले होते. व त्या सभेतून नवीन समिती तयार करण्यात सुध्दा आली होती. व वृत्तपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, ती समितीच नियमबाह्य करण्यात आली असल्याबाबतची तक्रार सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या पालकांचीच ओरड असून, त्या पालकांनी निवड समिती रद्द करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार केली आहेत.

दिलेल्या तक्रारीत त्यांचे म्हणणे असे आहेत की, समितीची निवड करीत असताना पालकांची कमीतकमी ७५ टक्केच्या उपस्थीतीत निवड करणे बंधनकारक असताना त्या पध्दतीने निवड केल्या गेली नाहीत. त्या मुळे अनेक पालकांना त्या पासून वंचित राहावे लागलेत. त्यांच्या अधिकारावर शाळेने पाणी फिरवले. शाळा समितीत अध्यक्षाची निवड करीत असताना निवड झालेल्या सदस्य लोकांना कोणतीच तशी सूचना न करता एकमतांनी अध्यक्षाची निवड घोषित केली. तसेच अंगणवाडी मदतनीस ही उपाध्यक्ष पदी राहू शकत नाहीत. तशी तिची निवड करून एका पालकांना अधिकारापासून वंचित केलेत. समिती गठित करीत असताना आरक्षण पाहून न करता चुकीची सदस्य निवड करण्यात आली. सर्वसाधारण लोककरीता निवडीतुन निवड करण्याची संधी देण्यात आली नाहीत. विशेष महत्वाची बाब म्हणजे अध्यक्षाची निवड ही सर्व निवड केलेल्या सदस्यातून करणे कायदेशीर असताना सुध्दा त्यांनी वर्ग ७ च्या पालकांना बोलावून त्यांच्यातून अध्यक्षाची निवड केली ही बाब नियमबाह्य आहेत. बाकी इतरही सदस्यांना त्या पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला व आपल्या जवळील व्यक्तींना पदावर बसण्यासाठी डाव रचला. हे कृत्य गावाच्या दृष्टीने योग्य नाहीत. करीता तक्रारीची तात्काळ दाखल घेवून ही समिती रद्द करण्यात यावी, अशी दिलेल्या निवेदनातून केली आहे. नुकतीच समिती गठीत झालेली रद्द न केल्यास आम्ही पालक मोर्चे, आंदोलन करू असा इशारा निवेदनातुन तक्रार कर्त्यानी दिला आहेत. या निवेदनात निवड झालेल्या सदस्य व २९ पालकांच्या सह्या आहेत. संबंधित अधिकारी या निवेदनावर काय कार्यवाही करतात. या कडे सर्व पालकांचे लक्ष वेधले आहे.
नरसाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची नियमबाह्य निवड; समिती रद्द करण्यासाठी पालकांनी दिले निवेदन नरसाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची नियमबाह्य निवड; समिती रद्द करण्यासाठी पालकांनी दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on January 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.