२१ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (०१ सप्टें.) : शहरातील खांजी वार्ड येथील एका २१ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार दि.०१ संप्टें. ला सव्वा बाराच्या वाजताच्या सुमारास उघडीस आली.

मोना हरिदयाल चव्हाण (२१) असे युवतीचे नाव आहे. ती खांजी वार्ड वरोरा येथील रहिवाशी असून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.

प्राप्त माहितीनुसार मोनाचे आई वडील घर च्या शेतातील कामासाठी गेले होते. घरी मोठा भाऊ व वहिनी होते, परंतु ते शेजारच्या घरी बसले होते. मोना आपल्या घरी एकटीच होती, घरी कोणी नसल्याने तीने गळफास घेतला असे माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्याचे दिवशी सकाळी मोनाने एक चिट्ठी लिहिली होती. त्यामध्ये असे लिहिलेले की, आईबाबा, भाऊ बहिणींना मला माफ करा मी आत्महत्या करीत आहे. आईबाबा तुम्ही खूप चांगले आहात, मला पुढच्या जन्मी तुमच्यासारखे आईवडील मिळावे असे चिट्ठीत नमूद केले असून, माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नाही. मी स्वतः जबाबदार आहे. 

अखेर तीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृत्यूदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.


"विशेष उल्लेखनीय की, मोनाचे पंधरा दिवसा अगोदर सगाई झाली होती. आईवडीलांनी तिच्या इच्छेनुसार मुलगा बघून साक्षगंध केले. ती  खुश होती तरी सुद्धा तीने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अजूनही कळलेले नाही." 

माथार्जून आश्रम शाळेत खावटी अनुदान किट वाटपाचा कार्यक्रम


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०१ संप्टें) : खावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यात आनंदाचे  वातावरण आहे. मागील वर्षापासून खावटी अनुदाना मिळण्याची प्रतीक्षा लागली होती. ती आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२१ ला संपल्याने लाभार्थ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.

झरी तालुक्यातील माथार्जुन येथील आश्रम शाळा येथे खावटी अनुदान योजनेचे साहित्य किट प्राप्त झाल्यानंतर आज पात्र लाभार्थ्यांना खावटी अनुदान किट वाटप करण्यात आले आहे. यामध्ये माथार्जुन- साझा, मुळगाव-साझा, टेभी-साझा, कुंडी-साझा, गावाचा समावेश असून, आदिवासी लाभार्थ्यांना अनुदान किट देण्यात आले. यावेळी माथार्जुन पोलीस पाटील प्रकाश गेडाम, तंटामुक्त अध्यक्ष शरीफ शेख, मुख्याध्यापक सोनोने सर, अधिक्षक राठोड सर, अधिक्षिका कांबळे, अराडे मॅडम यांच्या उपस्थितीत खावटी अनुदान वाटप करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षपासून कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांवर उपासमारी ची वेळ आली. त्यात अती दुर्गम भागातील आदिवासी बांधव यांना उपजिवीकेचे साधन नसल्याने सरकार द्वारा आदिवासिंना खावटी अनुदान योजना राबवण्यात आली. त्यामध्ये रुपये २०००/- थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित अनुदान आज रोजी वाटप करण्यात आले आहे.

शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून अशोक नारायण भांडेकर यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (०१ संप्टें.) : श्री. अशोक नारायण भांडेकर यांची पांढरकवडा शहर उपअध्यक्ष म्हणून नियुक्ती जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांनी केली आहे.

श्री. अशोक भांडेकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेना शहर अध्यक्ष म्हणून या आधी सुद्धा शिवसेनेचे काम केले आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगणवार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. जयवंत बंडेवार व सर्व शिवसैनिक यांना दिले.

पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी किट चे वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०१ ऑगस्ट) : तालुक्यातील पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर जगन राठोड, उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषि अधिकारी कार्यालय पांढरकवडा मार्फत सुरक्षित रासायनिक कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरात डॉ.बिराजदार व डॉ.निखिल चव्हाण प्रा.आ.के. पाटणबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराकरिता पाटणबोरी, पिंपरी बोरी, वाऱ्हा, कवठा, सून्ना, घुबडी, वडवाट येथील फवारणी करणारे शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना रासायनिक कीटक नाशकांची सुरक्षित हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच कापूस व सोयाबीन पिकावरील कीड व रोगाबद्दल माहिती राकेश दासरवार तालुका कृषि अधिकारी पांढरकवडा यांनी केले.   सिंजेटा इंडिया लि. मार्फत उपस्थितांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता दिनेश चव्हाण मंडळ कृषि अधिकारी पाटणबोरी, कृषि सहाय्यक आर बी चव्हाण, अश्विनी बोके, राहुल सोयाम तसेच सुरज गड्डमवार तालुका गट तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेखर पालावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

बोरी इजारा शेत शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर ई- पीक पाहणी,


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
यवतमाळ, (०१ संप्टें.) : यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमोल भाऊ येडगे साहेबांनी स्वतःचा पिक पेरा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी स्वतः अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा कार्यक्रम हाती घेऊन पुढाकार घेतलेला यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान सुद्धा केले आहे सद्या कृषी व महसूल खात्याकडून चालू आहे राज्य शासनाच्या माध्यमातून लवकर तंत्रज्ञानाचे हे कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे शेतकऱ्यांचा पिक पेरा , हा तलाठी कडून भरल्या जात होता यंत्रणेच्या माध्यमातून हा पिक पेरा स्वतः शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील भरून अचूक माहिती शासनाला व प्रशासनाला प्राप्त व्हावी यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतल्या बोलल्या जात आहे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कोणती पिके पेरली आहेत ही माहिती शेतकर्‍यांकडून घेऊन आजपर्यंत तलाठी कार्यालयात भरत आलेली आहे मागील दोन वर्षापासून पिक विमा काढताना पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र शासनाने अंमलबजावणी केली आहे असे असताना तलाठी व महसूल यंत्रणेवर ताण कमी करून हा नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे याबाबत ग्रामीण विभागामध्ये शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून सोशल मिडिया , तलाठी असेल त्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम चालू आहे. याचाच भाग म्हणून महागाव तहसील अंतर्गत काल कासोळा महसूल मंडळांत बोरी ईजारा या गावचे तलाठी डी व्ही मिठे यांनी मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांच्या फार्महाऊसवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावरून, ई-पिक पाहणी ची माहिती सदर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूमापन क्रमांक तसेच सर्वे नंबर गट क्रमांक हंगाम निवडा संपूर्ण वर्ष पेरणीसाठी लावगड उपलब्ध क्षेत्र व उपलब्ध सिंचनाच साधन शेतकरी खातेदार यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई- पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड कशा पद्धतीने करावा लागतो व यामध्ये ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून या नवीन ई-पिक पाहणी माहिती दिली. यावेळी अकबर पठाण अजय भाऊ चव्हाण प्रदीप जाधव सुखदेव डवरे शेतकरी उपस्थित होते.

काय म्हणाले? शेतकरी नेते

मनीष भाऊ जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ

वर्गवारी होऊन निश्चित आकडेवारी प्राप्त होईल शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये लाभ घेताना याचा फायदा होईल. अनेक वेळा घोषणापत्रामध्ये वेगळ्या पिकांची नोंद असायची व क्षेत्रावर वेगळी अशा एक नव्हे तर अनेक अडचणी यामध्ये येत होत्या, आता त्या अडचणी निश्चित दूर होतील पण त्यासोबत डोंगराच्या कुशीमध्ये या आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल असतोच असे नाही. हे जीपीएस सिस्टिम असून याला नेट असणे अत्यंत गरजेचे त्याशिवाय, ई-पीक पाहणी नोंद नेटचा च्या अभावी ग्रामीण विभागात अनेक वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते, आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच असे नाही. माहिती भरताना शासनाचे सर्व्हर वारंवार डाऊन होते,सर्व्हरची स्पीड टिकत नसल्याचे शेतकऱ्यांना शेतामध्ये इंटरनेट ची स्पीड कमी जास्त ही येताना दिसत आहे असे अनेक अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे शासनाने उपलब्ध संसाधनाचा ही विचार होणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांची हेळसांड होऊ नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने दक्षता घ्यावी.