सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (०१ संप्टें) : खावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यात आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षापासून खावटी अनुदाना मिळण्याची प्रतीक्षा लागली होती. ती आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२१ ला संपल्याने लाभार्थ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.
झरी तालुक्यातील माथार्जुन येथील आश्रम शाळा येथे खावटी अनुदान योजनेचे साहित्य किट प्राप्त झाल्यानंतर आज पात्र लाभार्थ्यांना खावटी अनुदान किट वाटप करण्यात आले आहे. यामध्ये माथार्जुन- साझा, मुळगाव-साझा, टेभी-साझा, कुंडी-साझा, गावाचा समावेश असून, आदिवासी लाभार्थ्यांना अनुदान किट देण्यात आले. यावेळी माथार्जुन पोलीस पाटील प्रकाश गेडाम, तंटामुक्त अध्यक्ष शरीफ शेख, मुख्याध्यापक सोनोने सर, अधिक्षक राठोड सर, अधिक्षिका कांबळे, अराडे मॅडम यांच्या उपस्थितीत खावटी अनुदान वाटप करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षपासून कोरोना मुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने अनेकांवर उपासमारी ची वेळ आली. त्यात अती दुर्गम भागातील आदिवासी बांधव यांना उपजिवीकेचे साधन नसल्याने सरकार द्वारा आदिवासिंना खावटी अनुदान योजना राबवण्यात आली. त्यामध्ये रुपये २०००/- थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित अनुदान आज रोजी वाटप करण्यात आले आहे.
माथार्जून आश्रम शाळेत खावटी अनुदान किट वाटपाचा कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
