टॉप बातम्या

पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान

सह्याद्री चौफेर | नंदकिशोर मस्के

महागाव : तालुक्यातील कासारबेहळ सेवानगर परिसरामध्ये शुक्रवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पैनगंगा नदी पूर आल्यामुळे कासारबेहळ सेवानगर येथील नाल्यालगत च्या शेतकऱ्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गजानन लांडगे सेवा नगर शेत सर्वे नंबर 29 यांच्या शेतातील सिमेंट बंधारा फुटून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. नदी लगत असलेल्या या शेतकऱ्याचे कापूस, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कासारबेहळ सेवानगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात नदी नाल्याचा पूर आल्याने शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन तूर ऊस व इतर पिकाचे प्रचंड हानी झाली असून महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी जोर धरत आहे. 

तसेच कृषी विभागाने लक्ष देऊन सिमेंट बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी गजानन लांडगे करत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();