सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी–मारेगाव राज्य महामार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ आज गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात पिसगाव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण तुळशीराम येरमे (45) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या मागे बसलेला चुलतभाऊ रवी येरमे सुदैवाने बचावला.
दोघेही खासगी कामासाठी वणीला गेले होते. परत येताना हा अपघात घडला. प्रवीण येरमे हे स्वस्त धान्य दुकान चालवत होते. त्यांच्या पश्चात आई–वडील, पत्नी, दोन मुली व दोन विवाहित बहिणी आहेत. माजी उपसरपंच तुळशीराम येरमे यांचा एकुलताऐक प्रवीण मुलगा असून या दुर्दैवी घटनेने पिसगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.