सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : चंद्रपूरहून यवतमाळकडे जाणारी बस (क्र. MH 40 Y 5782) आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची जळका फाट्यानजीक गुरुवारी रात्री 8.15 वाजता भीषण समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून बस व ट्रक चालकांसह अंदाजे 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकने अक्षरशः अर्धी बस चिरली.
मृतक व जखमींची अधिकृत नावे मिळू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच आमदार संजय देरकर (वणी विधानसभा क्षेत्र) यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची तत्काळ अंमलबजावणी केली. बहुतांश जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.