टॉप बातम्या

जेतवन बुद्ध विहार, नांदेपेरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील नांदेपेरा येथे भारतीय बौद्ध महासभा तथा रमाबाई महिला मंडळ नांदेपेरा-पोहणा यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन जेतवन बुद्ध विहारात अत्यंत श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पांडुरंग मजगवळी होते. तर विशेष अतिथी म्हणून श्री मुनेश्वर सर (मुख्याध्यापक, श्री गुरुदेव प्राथमिक मराठी शाळा, नांदेपेरा), ग्रामपंचायत सरपंच श्री विलास चिकटे, भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेपेरा-पोहणा अध्यक्ष श्री सुरेश दादाजी शेंडे, समाजसेवक श्री राजू ठमके, उपाध्यक्ष श्री सुखदेव येरेकर, समाजसेवक श्री भास्करराव खामनकर, सचिव ताराचंद वनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

संध्याकाळी भारतीय बौद्ध महासभा आणि रमाबाई महिला मंडळाच्या वतीने भिमज्योत धम्म रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य मार्गाने ग्रामपंचायत नांदेपेरा रंगमंचापर्यंत पोहोचली, जिथे पुन्हा डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर जेतवन बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. संतोष रामटेके, सूत्रसंचालन आयु. सुरेश शेंडे, आभारप्रदर्शन आयु. रवी वनकर यांनी मानले.

या कार्यक्रमास समाजबांधव व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();