सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगरपरिषदेच्या निर्णायक टप्प्यावर वणीकरांमध्ये एक सूर ठळकपणे उमटताना दिसत आहे. वणीच्या भविष्याचा विश्वासार्ह पर्याय म्हणजे डॉ. संचिता विजयराव नगराळे (गेडाम).
शहराच्या राजकीय प्रवाहात ‘मशाल’ची तेजस्वी झळाळी सर्वांनाच आकर्षित करत आहे.
उच्च शिक्षण, व्यवहारकुशलता, समस्या ओळखण्याची नैसर्गिक दृष्टी आणि लोकांशी असलेलं थेट नातं,या सर्व गुणांनी सजलेली डॉ. नगराळे आज वणीकरांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू बनल्या आहेत.
वणीच्या नगरपरिषदला खऱ्या अर्थाने अनुभवी, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला पर्याय नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शहराच्या विकासाची गती वाढवणारा, नियोजनबद्ध काम करणारा उमेदवार अखेर वणीत मिळाला आहे, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रचाराचा आवाज क्षणाक्षणाला थांबत असला तरी
मतदारांच्या मनातील ‘मशाल’ मात्र पूर्वीपेक्षा अधिक तेजाने पेटलेली दिसते.
राजकारणात म्हणतात “ही रात्र वैऱ्याची!” आणि खरंच, अंतिम क्षणातील वातावरण पाहता मतदारांच्या मनातली लढाई अजूनही सुरूच आहे.
शहराच्या विकासाची दिशा बदलणारी संधी समोर उभी आहे, आणि “ही संधी वणी गमवणार नाही” असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत चालला आहे.
मतदारांच्या वाढत्या उत्साहावरून एक गोष्ट स्पष्ट होते.
डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांचा विजय केवळ शक्यता नाही, तर वणीच्या प्रगतीचा सुनिश्चित ‘शुभ संकेत’ आहे.
वणी आता जणू एकच आवाहन देत आहे.
“मशाल पेटवा… वणी उजळवा!”