टॉप बातम्या

निवडणूक प्रचार ‘क्लोज’च्या उंबरठ्यावर...माजी आमदार बोदकुरवार यांच्या वक्तव्याने राजकारण तापले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीवणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज अधिकृतपणे थांबणार असला, तरी शेवटच्या क्षणी आलेल्या एका जोरदार विधानामुळे संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
निवडणूक प्रचार ‘क्लोज’च्या उंबरठ्यावर असताना हे विधान लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरले आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केलेले विधान सोशल मीडियावर क्षणात वाऱ्यासारखे वायरल झाले. एका व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे म्हणताना दिसतात.

 “भाजपमधून गेलेला एकही माजी नगरसेवक या निवडणुकीत निवडून येणार नाही.”

त्यांच्या या थेट व स्पष्ट विधानाने वणीच्या राजकीय वर्तुळात नवे तणाव निर्माण झाले असून, मतदारांमध्येही विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते हे विधान विरोधकांना साधलेलं लक्ष्य आहे, तर काही मतदार बोदकुरवारांच्या शब्दांच्या वजनावर आता निवडणुकीचा अंतिम कल निश्चित होईल असा अंदाज व्यक्त करत आहेत.

प्रचाराची धामधूम थांबली असली तरी या वक्तव्याने नवीन ‘क्लायमॅक्स’ तयार केला असून वणीकर आता प्रतीक्षेत आहे.

“बोदकुरवारांचे भाकीत खरे ठरणार की राजकीय समीकरण वेगळे वळण घेणार?” हे चित्र ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होणार आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();