टॉप बातम्या

भाऊ तिघे… पण लाडक्या बहिणींच्या बोटावर एकच बटण!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : 29 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील अंबरनाथच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाने राज्यभर चर्चांना उधाण आले.
“ज्या उमेदवारामागे महिला, त्याचा नंबर मतपेटीत पहिला!”

या शब्दांनी महिलांच्या ताकदीचा ठसा उमटवतानाच वणीच्या राजकीय समीकरणात एक नवा प्रश्न निर्माण केला आहे. कारण वणी शहरात अंदाजे ५० हजार लोकसंख्येपैकी महिला मतदारांची संख्या २६० ने अधिक आहे. म्हणजे शहराचा अंतिम निर्णय कोण देणार हे स्पष्ट. लाडक्या बहिणीच!

पण नेमके इथंच मोठं कोडं उभं राहतं…
युतीचे लाडके भाऊ तिघे देवा भाऊ, एकनाथ भाऊ आणि अजितदादा.
मग लाडक्या बहिणींनी बटण दाबायचं कोणत्या भावाचं?
हा प्रश्न मतदानाच्या तोंडावर आणखीनच तीव्र झाला आहे.

महिलांचा कौल कोणाकडे झुकतोय याची चाचपणी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. रस्त्यावर, चौकात, बाजारात, अंगणात, सर्वत्र चर्चेचा एकच मुद्दा :
“या वेळेस कोणता भाऊ जिंकेल बहिणींचं मन?”

उद्या २ डिसेंबरला मतदान, आणि त्यानंतरच्या दिवशी ३ डिसेंबरला निकाल.
आज लाडक्या बहिणींच्या मनात विचारांचा गोंधळ, उद्या त्यांचे हात मतदान यंत्रावर…आणि परवा येणाऱ्या निकालात या कोड्याचा उलगडा होणार आहे.

बहिणींच्या ‘एक बटण’वर तीन भावांचे भवितव्य टिकले आहे.
आता सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे, लाडक्या बहिणी कोणाला देतील आपल्या विश्वासाचं मत? निकालच सांगेल.

भावांची संख्या तीन असली, तरी बहिणींचा निर्णय एकच… आणि निर्णायक!

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();