टॉप बातम्या

डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांचे व्हिजन : निकृष्ट कामांना आळा, सोलरसिटी व मोहल्ला क्लिनिकची घोषणा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात गेल्या काही काळात विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली. रस्ते काही दिवसातच उखडले, नाल्या आणि चेंबर लेव्हलशिवाय बसवण्यात आली. अशा डागडुजीच्या कामांमुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन केला.
या पार्श्वभूमीवर “मी नगराध्यक्ष झाले तर शहरातील कोणतेही काम निकृष्ट होणार नाही,” असा ठाम शब्द शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांनी दिला. रविवारी झालेल्या रॅली आणि कॉर्नर सभांमध्ये त्यांनी आपले व्हिजन वणीकरांसमोर मांडले.


सोलरसिटीचा उपक्रम : स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल

डॉ. नगराळे (गेडाम) म्हणाल्या की, वणीत मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन उपलब्ध असून तिचा वापर वीजनिर्मितीसाठी करता येईल. त्यांनी स्पष्ट केले की, निवडून आल्यास वणीमध्ये सोलरसिटी उभारण्यात येईल, ज्यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वीज निर्माण होईल, शहराला स्थिर वीजपुरवठा मिळेल, वणी स्वावलंबी ऊर्जाकेंद्र म्हणून पुढे येईल.

प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक

वणीत वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी आरोग्यसेवा सुलभ करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
“मी डॉक्टर असल्याने लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक उभारण्याची घोषणा केली.
या क्लिनिकमुळे नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार, तपासण्या व औषधे मिळतील, छोट्या आजारांसाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, गरीब व सामान्य वर्गासाठी मोफत व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होईल.

महिलांसाठी रोजगारनिर्मिती

डॉ. नगराळे यांनी महिलांच्या आर्थिक प्रगतीलाही महत्त्व दिले.
त्या म्हणाल्या की, बचतगटांना प्रशिक्षण, कर्जसाहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होईल.
या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचे उत्पन्नही उंचावेल.

वणीच्या विकासाला नवी दिशा

डॉ. संचिता नगराळे यांनी शहरासाठी मांडलेले व्हिजन म्हणजे
दर्जेदार कामे, सोलर ऊर्जा, सुलभ आरोग्यसेवा आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी.या सर्व योजनांमुळे वणीकरांच्या मनात नवीन आशा निर्माण होत असून आगामी काळात वणीच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();