सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील सोईट वाळू घाटावर अवैध उत्खननाविरोधात महसूल विभागाने 10 डिसेंबरच्या रात्री मोठी कारवाई केली. तहसीलदार उत्तम निलावाड आपल्या पथकासह गस्त घालत असताना मारेगाव हद्दीत दोन पिवळ्या रंगाच्या पोकलेन मशिन्स अवैधरीत्या वाळू उपसा करताना आढळल्या. त्वरित दोन्ही यंत्रे जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आली.
महसूल विभाग सतत कारवाई करित असताना मात्र, वाळूची चोरी सुरूच आहे. वाळू चोरट्याना कारवाईची कसलीही भीती नसल्याचं मागील कारवाई वरून दिसून येतेय. त्यामुळे चोरीचे जाळे वाढल्याचे बोलल्या जातं. गुरुवारच्या मध्यरात्री वाळू घाटात वाळू उपसली जात असल्याचे तलाठ्याकडून समजताच तहसीलदार आपल्या ताफ्या सह त्या ठीकाणी गेलेत.दरम्यान या ताब्यात घेतलेल्या दोन मशिन्सवर नियमानुसार दंड ठोठावण्यात येणार असल्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरु असून एकूण ८५ लाखांचे पोकलेन आणि वाळू असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याआधीही हायवा, टिपर, ट्रॅक्टर आदी वाहनांवर महसूल विभाग सतत कारवाई करत आहे.
ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड,प्रवीण उपाध्ये,मनोज चिकनकर,विठ्ठल सरनाईक, सनी कुळमेथे,चालक विजय भाऊ आणि पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.
या धडक कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.