टॉप बातम्या

वणी : अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीची कारवाई; ३.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नांदेपेरा रोडवर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ डिसेंबरच्या संध्याकाळी देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला कारसह अटक केली. परिसरात सततच्या गस्तीदरम्यान पथकाला पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारमधून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात संशयित वाहन थांबवून तपासले असता १,०४८ बाटल्यांचा देशी दारूचा साठा आढळला.

वाहनचालकाने आपले नाव मोहम्मद इरफान मोहम्मद सिद्दीकी (३७), रा. भिमनगर, वणी असे सांगितले. कोणताही परवाना नसताना तो हा साठा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने ४३,८४० रुपयांची देशी दारू आणि अंदाजे ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ३ लाख ४३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास वणी पोलिसांकडे चालू आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();