टॉप बातम्या

शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीशिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वणी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

विश्वास नांदेकर यांनी शिक्षक या पेशातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख, विधान परिषदेचे आमदार तसेच संपर्क प्रमुख अशी विविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. सन 2004 ते 2009 या काळात ते वणी विधानसभेचे आमदार राहिले.  

संघटनेवर मजबूत पकड, प्रशासनावर वचक आणि ठाम निर्णयक्षमता ही त्यांची ओळख होती. राजकीयदृष्ट्या भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले नांदेकर हे जनतेसाठी सदैव झटणारे, कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील नेते म्हणून परिचित होते. त्यामुळेच सामान्य जनतेमध्ये त्यांना विशेष मानाचे स्थान होते.
मागील काही दिवसांपासून ते विविध शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाच्या गुडघ्याचे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून ते मुंबई येथील प्रसिद्ध लिलावती रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.

त्यांच्या निधनामुळे वणी विधानसभा क्षेत्रात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईहून त्यांचे पार्थिव वणी येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून तेथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();