टॉप बातम्या

वणीत भाजपचा झंझावात; विद्या आत्राम नगराध्यक्षपदी विजयी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीनगर परिषदेच्या निवडणुकीत वणीतील मतदारांनी स्पष्ट आणि ठाम निर्णय देत भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवली आहेत. प्रचाराच्या काळात शिवसेना (उबाठा) गटाच्या संचिता नगराळे यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र मतमोजणी सुरू होताच भाजपच्या विद्या आत्राम यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत विरोधकांना मागे टाकले.

फेरीमागून फेरी भाजपची मतसंख्या वाढत गेली आणि अखेर विजय निश्चित झाला. 29 सदस्यांच्या नगर परिषदेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा भाजपने सहज पार केला. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाला मर्यादित यश मिळाले असून त्यांना फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची कामगिरी मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर ठरली असून केवळ 3 जागा त्यांच्या वाट्याला आल्या. उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.

निकाल जाहीर होताच शहरात आनंदाचे वातावरण पसरले. भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजय साजरा केला. भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे आता वणी शहरातील विकासकामांना गती मिळेल आणि शहराचा सर्वांगीण बदल घडेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


विकासाला मिळणार गती
मागील काही वर्षांत वणी नगर परिषदेतील राजकीय कुरघोडींमुळे अनेक विकासकामे रखडली होती. सत्तेतील मतभेद आणि अस्थिरतेचा फटका थेट शहराच्या प्रगतीला बसला होता. मात्र या वेळी मतदारांनी स्पष्ट भूमिका घेत कोणत्याही आघाडी सरकारऐवजी भाजपला निर्विवाद बहुमत दिले आहे.
नगराध्यक्षपदासह सभागृहातील संख्याबळ एकाच पक्षाकडे असल्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय अडथळे दूर होऊन रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, तसेच वणी शहराच्या विकासाला आता नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे


 भाजप (18): रिता महेश पहापळे 927, वैशाली विनोद वातिले 941, लक्ष्मण महादेव उरकुडे 870, अर्चना संजय पुनवटकर 1125, राकेश लक्ष्मण बुग्गेवार 959, सोनाली प्रशांत निमकर 1579, रितिक लक्ष्मण मामीडवार 1141, उषा नत्थू डुकरे 676, नितीन गोपाल धाबेकर 598 , प्रमिला मनोज चौधरी 761, आरती गिरीश वांढरे 1221 , अनिल लाभचंद चिंडालिया 1284, रेखा विलास कोवे 1185, लवली किशन लाल 710, पूजा रविंद्र रामगिरवार 821, मनोज कवडी सीडाम 648, मनीषा राजू गव्हाणे 1310, अर्चना शंकर झिलपे 1479.

शिवसेना उबाठा (6): अजय पांडुरंग धोबे 540, प्रणाली गणेश देऊळकर 970, अनिकेत अनिल बदखल 439, सुधीर रामदेव थेरे 519, किरण शंकर देरकर 1245, गुलाम रसूल रंगरेज 1513.

काँग्रेस (3): करुणा रवींद्र कांबळे 758, अलका मारोती मोवाडे 1193, सैफुर रहेमान1247.

अपक्ष (2): धनराज रमेश भोंगळे 685, अब्दुल हाफिज सत्तार 836.


पक्षीय बलाबल (एकूण जागा 29)

भारतीय जनता पक्ष: 18 (बहुमत)

शिवसेना (उबाठा): 06

काँग्रेस: 03

अपक्ष: 02

नगराध्यक्ष: भाजप (विद्या आत्राम)

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();