सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरात चोरीच्या घटना सतत घडत असून एका ब्रोकरशिपची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही घटना २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध शेवाळकर परिसरात दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.
बंडू तुकाराम बानकर वय ५५, रा. गणेशपूर, छोरिया ले-आउट, (वणी) असं पैसे चोरी गेलेल्या ब्रोकरशिप करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. यांची दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबत त्यांनी (ता. २६) पोलिसात तक्रार नोंद केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी यांचे मोटारसायकल क्र.एम.एच 29-सी.ए.7098 टी.व्ही.एस. कंपनीची आयक्युब ईलेक्ट्रीक मोटरसायकल चे डीक्कीमध्ये ठेवलेले 1,50,000/-रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने मोटरसायकल ची डीक्की उघडुन चोरुन नेले आहे. सदर घटना शेवाळकर परिसरात घडली.अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील घटनेचा अधिक तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आसोरे करत आहे.