सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील श्री महादेव मंदिरात श्री शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. ही कथा श्रध्येय श्री कृष्णकुमार पांडेयजी महाराज (श्री क्षेत्र कशी वाराणसी) यांच्या मधुर वाणीने दिनांक 20 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे.
या धार्मिक कथेचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव पुराण समिती, मार्डी तसेच मार्डी ग्रामवासि यांच्या वतीने करण्यात आले आहे.